Multibagger Stock : शेअर नाही, हा तर रॉकेटसिंग, गुंतवणूकदार एकाच महिन्यात मालामाल, स्टॉकची 15 रुपयाहून 36 रुपयांवर झेप
Multibagger Stock : या बँकेचा स्टॉक ठरला रॉकेटसिंग..तुमच्याकडे आहे का हा शेअर?
नवी दिल्ली : बऱ्याच दिवसानंतर सरकारी बँकांच्या (Government Bank) शेअरने (Share) गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. यामध्ये बँकेच्या एका शेअरने तर कमाल केली आहे. त्यामुळे शेअरधारक थिरकले आहेत. हा शेअर मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरु पाहत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा (Double Return) दिला आहे. एकाच महिन्यात या बँकेच्या शेअरने दुप्पट भरारी घेतली आहे. त्यामुळे बाजारातील तज्ज्ञही या शेअरवर आणि त्याच्या घौडदौडीवर विशेष लक्ष ठेवून आहे.
तर ही कमाल केली आहे, ती यूको बँकेच्या (UCO Bank) शेअरने. 18 नोव्हेंबर 2022 रोजी बँकेचा शेअर 15.75 रुपये होता. तो एकाच महिन्यात दुप्पट झाला. 16 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 36.50 रुपये झाला. या शेअरने एकाच महिन्यात रॉकेट भरारी घेतली आहे.
बँकेची ही घौडदौड पाहता, बाजारातील तज्ज्ञांनी या शेअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. या शेअरच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या शेअरने केलेली ही कमाल घौडदौड असल्याने ही तेजी कायम राहील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडा सयंम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यूको बँकेच्या शेअरची कामगिरी चांगली झाली. एका महिन्यात या शेअरमध्ये 144 टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे. एका आठवड्यात 54.24%, तर तीन महिन्यात 200.83% जरोदार परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता हा शेअर आणखी वधारेल असे वाटत आहे.
यूको बँकेच्या शेअरने डिसेंबर 2010 मध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. तेव्हा या शेअरचा भाव 137.90 रुपायांवर पोहचला होता. त्यानंतर हा शेअर सातत्याने घसरला. त्यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले होते. आता या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
बँकेची आर्थिक आघाडीवर प्रगती सुरु आहे. महसूलात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँकेच्या नफ्यातही वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीचा शुद्ध नफा 504 कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.