Uday Kotak : उदय कोटक यांचा राजीनामा, कोण सांभळणार बँकेची धुरा

Uday Kotak : देशातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला. कंपनीने शनिवारी स्टॉक एक्सचेंजला याविषयीची माहिती दिली. त्यांच्या जागी बँकेची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल..

Uday Kotak : उदय कोटक यांचा राजीनामा, कोण सांभळणार बँकेची धुरा
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 5:02 PM

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : देशातील सर्वात श्रीमंत बँकर्स उदय कोटक (Uday Kotak) यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला. कंपनीने शनिवारी स्टॉक एक्सचेंजला या घाडमोडींची माहिती दिली. बँकेचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत अंतरिम जबाबदारी स्वीकारली. पण त्यासाठी RBI आणि बँकच्या सदस्यांची मंजूरी आवश्यक आहे. बँकेने 1 जानेवारी 2024 रोजीपासून नवीन एमडी आणि सीईओ पदासाठी आरबीआयकडे अर्ज करण्यात येणार आहे. कोटक यांनी काही दिवसांपूर्वीच याविषयीचे संकेत दिले होते. त्यांनी बँकेत नॉन एक्झीक्युटिव्ह भूमिका घेण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. उदय कोटक यांना जानेवारी 2021 मध्ये तीन वर्षांसाठी या पदावर निवडले होते. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर, 2023 पर्यंत होता. पण त्यांनी त्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला.

तात्काळ दिला राजीनामा

उदय कोटक यांनी मंडळाला राजीनाम्याविषयी कळवले. त्यात त्यांनी तात्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याची माहिती दिली. राजीनामा देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. ते आता नॉन एक्झीक्युटिव्ह सदस्य म्हणून बँकेशी जोडलेले असतील.

हे सुद्धा वाचा

तिसरी सर्वात मोठी बँक

कोटक महिंद्रा बँक देशातील तिसरी सर्वात मोठी खासगी बँक आहे. या बँकेची स्थापना 1985 मध्ये एनबीएफसीच्या रुपाने झाली होती. तेव्हापासून उदय कोटक बँकेने आगेकूच केली. 2003 मध्ये कोटक महिन्द्राला कर्मशिअल बँकेचा परवाना मिळाला. तीन दशकांहून अधिक काळात बँकेच्या भांडवलात मोठी वाढ झाली. ज्या गुंतवणूकदारांनी 1985 मध्ये बँकेत 10,000 रुपयांची गुंतवणूक केली. त्याचे मूल्य 300 कोटी रुपये झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदय कोटक यांची या बँकेत 26 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांची एकूण संपत्ती 13.7 अब्ज डॉलर आहे.

इतकी आहे संपत्ती

फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार (Forbes rich List 2023) आज उदय कोटक भारताचे दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती (Uday Kotak Net Worth) 1.15 लाख कोटी रुपये आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. राजीनामा दिल्यावर ही ते नॉन एक्झीक्युटिव्ह सदस्य म्हणून बँकेशी जोडलेले असतील.

उधारीत सुरु झाली वित्तीय संस्था

कोटक कुटुंबिय कापसाचा व्यापार करत. उदय कोटक यांना वित्तीय सेवा संस्था सुरु करायची होती. नातेवाईक आणि मित्रांकडून त्यांनी 30 लाख रुपये उधार घेतले. 1985 मध्ये त्यांनी ही वित्तीय आणि गुंतवणूक कंपनी सुरु केली. त्याचवेळी महिंद्रा समूह पण आला. या कंपनीचे नाव कोटक महिंद्रा फायनान्स असे ठेवण्यात आले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.