UltraTech Q4 : कंपनीचं बजेट नफ्यात, 48% वाढीसह 2 हजार कोटींवर; शेअर धारकांना बंपर डिव्हिडंड!
गेल्या वर्षी समान जानेवरी-मार्च तिमाहीत 1,774.13 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॉम्बे स्टॉक्स एक्स्चेंजवर अल्ट्रा टेक सिमेंटचा शेअरचा भाव 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 6629 रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मार्केट कॅपिटल 1,91,359.90 कोटींवर पोहोचले आहे.
नवी दिल्ली : आघाडीची सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्रा टेक सिमेंटच्या (Ultra tech cement) नफ्यात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. मार्च 2022 मध्ये संपलेल्या चौथी तिमाहीत अल्ट्राटेक सिमेंटच्या नफा (net profit) 47.32 टक्क्यांच्या वाढीसह 2,613.75 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान जानेवरी-मार्च तिमाहीत 1,774.13 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॉम्बे स्टॉक्स एक्स्चेंजवर अल्ट्रा टेक सिमेंटचा शेअरचा भाव 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 6629 रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मार्केट कॅपिटल (Market capital) 1,91,359.90 कोटींवर पोहोचले आहे. समीक्षाधीन तिमाही दरम्यान अल्ट्रा टेक सिमेंट संपत्तीत 9.45 टक्क्यांच्या वाढीसह 15,767.28 कोटीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी समान आर्थिक तिमाहीच्या तुलनेत 14,405.61 कोटी रुपयांवर होते. अल्ट्रा टेक सिमेंटचा एकूण खर्चात 15.38 टक्क्यांच्या वाढीसह 13,604.20 कोटीवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी 2021-22 चौथ्या आर्थिक तिमाहित11,790.41 कोटी रुपये होते.
भाववाढीसोबत मागणी
कोविड प्रकोपानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येत आहे. दरम्यान, सिमेंटचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सी इक्रानुसार, वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात देशात सिमेंट विक्रीत 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. सध्या विक्री 38.2 कोटी टनांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात विक्रीचा हा आकडा 35.5 कोटी टन इतका होता. आता किंमती वाढल्याने आणि मागणीतही वाढ होत असल्याने कंपन्यांच्या आर्थिक बजेट सुधारण्याची शक्यता आहे.
सिमेंटचा ‘बिग’ बॉस
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही मुंबई स्थित आघाडीची भारतीय सिमेंट कंपनी आहे. सिमेंट कंपनी आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे. अल्ट्राटेक भारतातील ग्रे सिमेंट, रेडी-मिक्स कॉंक्रिट आणि पांढऱ्या सिमेंटची सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. अल्ट्रा टेक सिमेंटची प्रतिवर्ष उत्पादक क्षमता 116.75 दशलक्ष टन आहे.चीन नंतर एकाच देशात शंभर लक्ष टनाहून अधिक उत्पादन करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.