Salary : नोकरीचं टेन्शन सोडा, नोकरी गमावली तरी मिळेल दर महिन्याला पगार, योजना तरी काय?

Salary : आता नोकरीची चिंता कोण करी? काय आहे ही सरकारची योजना..

Salary : नोकरीचं टेन्शन सोडा, नोकरी गमावली तरी मिळेल दर महिन्याला पगार, योजना तरी काय?
नोकरीची चिंता सोडाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 8:56 PM

नवी दिल्ली : कपात, मंदी (Recession), व्यवसायातील तोटा अशा बातम्या सातत्याने येऊन धडकत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे (China Corona) थैमान सुरु आहे. जगभरात पुन्हा कोरोनाची भीती येऊ घातली आहे. अनेक अर्थव्यवस्थेला (Economy) त्यामुळे हादरे बसत असताना, कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. अशावेळी मागील अनुभव पाहता प्रत्येक कर्मचाऱ्याने शहाणपणाचं धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे अचानक नोकरी गेली (Job loss) तरी तुम्हाला रोजचा व्यवहार करता येणे सोप्पं व्हावं यासाठी काही तजवीज होऊ शकते.

नोकरदार वर्गाला कोरोनाची भीती सतावत आहे. त्याचा सर्व खर्च महिन्याकाठी अथवा महिन्याच्या पहिल्या दिवशी मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतो. घर खर्च, मुलांचे शिक्षण, ईएमआय, इतर खर्च, दवाखाना, औषधांवरचा खर्च वेतनातून भागविल्या जातो. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी गेली तरी दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहील..

बेरोजगारी भत्ता तुम्ही ऐकला असेल, पण बेरोजगारीचा विमा ही असतो. नोकरी गेल्यानंतर तुम्हाला दर महा एक ठराविक रक्कम मिळते. जर नोकरी गमावली नाही तर एका निश्चित कालावधीत या योजनेतंर्गत तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल. भारतात अजून तरी नोकरी गेल्यानंतर दरमहा निश्चित विम्याची प्रथा नाही. तसा प्लॅनही बाजारात लोकप्रिय नाही.

हे सुद्धा वाचा

काही विमा योजना आणि पॉलिसी आहेत, ज्या नोकरी गमावल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा देतात. भारतात कर्मचाऱ्यांची सुरक्षा कर्मचारी राज्य विमा म्हणजे ESI करते. त्याआधारे कर्मचाऱ्याला उपचार आणि इतर सुविधा प्रदान करण्यात येतात. अत्यल्प दरात ही सुविधा मिळते.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना (Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana) आणि अटल विमा व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemti Vyakti Kalyan Yojana) या दोन योजना तुमच्या मदतीला धावून येतील. या योजना दरमहा एक निश्चित रक्कम देतील.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेत लोकांना मदत करण्यात येते. नोकरी गेल्यानंतर आर्थिक मदत मिळते. ESIC ने 2005 मध्ये ही योजना अंमलात आणली होती. नोकरी गेल्यानंतर 50 रक्कम बेरोजगारी भत्याच्या रुपाने मिळते. ही मदत दोन वर्षापर्यंत मिळते.

अटल विमा व्यक्ति कल्याण योजनेतही नोकरी गेल्यानंतर केंद्र सरकार आर्थिक मदत करते. या योजनेत केवळ तीन महिन्यांसाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेत तुमच्या वेतनाच्या 50 टक्के हिश्यावर दावा करता येतो. नोकरी सुटल्याच्या एका महिन्यानंतरच दावा करता येतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.