त्वरा करा..! यूनियन अ‍ॅक्टिव्ह मोमेंटम फंडात गुंतवणुकीसाठी उरले शेवटचे काही दिवस, जाणून घ्या सर्वकाही

तुम्हीही गुंतवणुकीसाठी एखादा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. युनियन म्युच्युअल फंडाने अलीकडेच फॅक्टर आधारित गुंतवणुकीच्या दृष्टीने पाऊल टाकलं आहे. भविष्यात चांगला परतावा देण्याऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.

त्वरा करा..! यूनियन अ‍ॅक्टिव्ह मोमेंटम फंडात गुंतवणुकीसाठी उरले शेवटचे काही दिवस, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 7:37 PM

युनियन म्युच्युअल फंडाने अलीकडेच फॅक्टर आधारित गुंतवणुकीचा पर्याय सुरु केला आहे. या आधारे भविष्यात गती दर्शविण्याऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा मानस आहे. अर्थात याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. एनएफओ म्हणजेच न्यू फंड ऑफर..म्युच्युअल फंड हाऊसेस त्यांच्या ऑफर आकर्षक बनवण्यासाठी नवीन योजना आणत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या एनएफओकडे पाहीलं जात आहे. याच थीमच्या आधारे युनियन म्युच्युअल फंडाने ‘युनियन ॲक्टिव्ह मोमेंटम फंड’ अर्थात ओपन-एंडेड इक्विटी योजना सुरू केली आहे. गुंतवणूकदारांना भविष्यात चांगला परतावा मिळावा या उद्देशाने सक्रीय शेअरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा एनएफओ 28 नोव्हेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरु झाला होता. 12 डिसेंबरपर्यंत या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे. 15 दिवासांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एनएफओ सबस्क्रिप्शन बंद होईल. योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आणि वाटप झाल्यानंतर स्टॉक्स मार्केटमध्ये पाच व्यावसायिक दिवसांच्या आत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी सुरु होईल. दुसरीकडे, युनिट्सच्या वाटपाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आता एनएफओ रिडीम केले किंवा स्विच आउट केल्यास 1 टक्का एक्झिट लोड लागू होईल. वाटपाच्या तारखेपासून एक वर्षानंतर रिडीम केल्यास किंवा स्विच आउट केल्यास एक्झिट लोड शून्य असेल.

यूनियन अ‍ॅक्टिव्ह मोमंटम फंडामार्फत मार्केटमधील सर्वच शेअर्सचा विचार केला जाणार आहे. मोमेंटम स्टॉक्स असे असतात जे तुलनेने उच्च किंमतीची गती दर्शवतात. या आधारावर ज्या स्टॉक्सने इतर स्टॉक्सच्या तुलनेत भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे आणि भविष्यात चांगली कामगिरी करेल अशा स्टॉक्सची गुंतवणुकीसाठी निवड केली जाईल. तसेच काही स्टॉक्सने तुलनेने खराब कामगिरी केली तर त्याच्याऐवजी दुसऱ्या स्टॉक्सचा पर्याय निवडला जाईल. गौरव चोप्रा, को-फंड मॅनेजर यांनी सांगितलं की, ‘गुंतवणूकदाराचं भावना लक्षात घेऊन या फंडची रचना करण्यात आली आहे. मोमेंटम इन्वेस्टिंग हा नियमावर आधारित असतो. ज्या स्टॉक्समध्ये प्रगती दिसणार आहे असे विकत घेतले जातील आणि ज्या स्टॉक्समध्ये उतरता आलेख असेल तेव्हा विकले जातील.’

इक्विटीचे प्रमुख संजय बेंबळकर म्हणाले, “गुंतवणूकदार कसे वागतात यावरून त्याची गती ठरते. माहिती, स्टॉकच्या किमती वाढवणे आणि गती निर्माण करणे किंवा त्या उलटही घडतं.” दुसरीकडे, मधु नायर, सीईओ, युनियन एएमसी यांनी सांगितलं की “युनियन ॲक्टिव्ह मोमेंटम फंड हा आमचा शुभारंभ आहे. आम्ही या श्रेणीवर उत्साही आहोत आणि ॲक्टिव्ह मोमेंटम सारख्या स्मार्ट बीटा रणनितीसह भारतीय शेअर बाजारात मोठी भूमिका निभावेल असा विश्वास आहे.”

Union_NFO

डिस्क्लेमर : म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.