Union Budget 2023 : निर्मला सीतारमण यांच्यापूर्वी  या आयर्न लेडीने सादर केले होते बजेट, सीतारमण यांच्या नावे अनेक रेकॉर्ड, तुम्हाला माहिती आहेत का?

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अगोदर या आयर्न लेडीने सादर केले होते बजेट

Union Budget 2023 : निर्मला सीतारमण यांच्यापूर्वी  या आयर्न लेडीने सादर केले होते बजेट, सीतारमण यांच्या नावे अनेक रेकॉर्ड, तुम्हाला माहिती आहेत का?
सीतारमण यांच्या नावे विक्रम
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 6:37 PM

नवी दिल्ली : स्वतंत्र भारतात आतापर्यंत पुरुष अर्थमंत्र्यांनीच सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. पण केवळ पुरुष अर्थमंत्र्यांनीच बजेट सादर केले असे नाही. सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांच्यापूर्वी ही एका आयर्न लेडीने (Iron Lady Of India) देशाच्या आर्थिक लेख्याजोख्याची जबाबदारी स्वीकारुन ती पार पाडली होती. भारताच्या राजकारणात उच्च पदावर महिलांची संख्या कमी असली तरी त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे. सध्याच्या अर्थमंत्री सीतारमण या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात त्या पाचवे बजेट सादर करतील.

अर्थमंत्री म्हणून देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण या दुसऱ्या महिला आहेत. यापूर्वी आयर्न लेडी म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी 1970 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. सध्याच्या अर्थमंत्री सीतारमण यांच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत.

निर्मला सीतारमण या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत. 1970-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांनी अर्थ मंत्रालय स्वतःकडे ठेवले होते आणि अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्याची जबाबदारी सीतारमण या वहन करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या महिला रक्षामंत्री असण्याचा बहुमानही त्यांच्याच नावे आहे.

हे सुद्धा वाचा

निर्मला सीतारमण यांच्या काळात ब्रिटिश कालीन अनेक प्रथांना फाटा देण्यात आला. 2019 मध्ये ब्रिटिश कालीन परंपरा त्यांनी बंद केली. बजेटची कागदपत्रे ब्रीफकेस वा सूटकेसमध्ये घेऊन जाण्याच्या परंपरेला त्यांनी फाटा दिला. त्याऐवजी लाल रंगाच्या कापडात गुंडाळून अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावे पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्याचाही रेकॉर्ड आहे. डिजिटल बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. 2021 मध्ये प्रोटोकॉलच्या दरम्यान हा प्रयोग राबविण्यात आला होता. त्यांनी पेपरलेस डिजिटल बजेट सादर केले होते. त्यानंतर बजेट कॉपी छापण्याची प्रथा बंद झाली.

तसेच सर्वात जास्त काळ बजेट भाषण करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. 2020-21 मध्ये बजेट सादर करताना त्यांनी 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले होते. त्याचवेळी त्यांनी त्यांचाच विक्रम मोडला. यापूर्वी जुलै 2019 मध्ये त्यांनी 2 तास 17 मिनिटांचे भाषण केले होते.

प्रत्येक अर्थसंकल्प खास असतो. त्याला विशिष्ट नाव आहे. भारताच्या इतिहासात काळा अर्थसंकल्प असाच गाजला. ब्लॅक बजेट 1973 साली सादर करण्यात आले होते. इंदिरा गांधी त्यावेळी देशाच्या पंतप्रधान होत्या तर यशवंतराव बी. चव्हाण हे केंद्रीय अर्थमंत्री होते. 28 फेब्रुवारी, 1973 रोजी हा अर्थसंकल्प सादर झाला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.