Union Budget 2023 : पॉवर, इन्फ्रा आणि फार्मा शेअर ठरतील गेमचेंजर? होईल बंपर कमाई

Union Budget 2023 : या केंद्रीय अर्थसंकल्प काळात या सेक्टरमधून गुंतवणूकदगारांना कमाईची मोठी संधी मिळू शकते.

Union Budget 2023 : पॉवर, इन्फ्रा आणि फार्मा शेअर ठरतील गेमचेंजर? होईल बंपर कमाई
Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पाकडून गृहिणींच्या काय आहेत अपेक्षा?
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 8:06 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूका होत आहे. त्यापूर्वी यंदाचे हे पूर्ण अंतिम बजेट आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात रोजगार, विकास आणि इतर मुद्यांवर केंद्र सरकार (Central Government) जास्त लक्ष केंद्रीत करेल. त्याचा अनेक क्षेत्रांना मोठा फायदा होईल. या क्षेत्रातील शेअरमध्ये (Share) तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचा फायदा होऊ शकतो. अर्थात हा केवळ अंदाज आहे. या क्षेत्रात घडामोडी दिसून येतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजच्या विश्लेषकांच्या मते, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करु शकतात. ग्राहकांना ईव्ही खरेदीसाठी मोठ्या सबसिडीची घोषणा करण्यात येऊ शकते. त्यामुळे बॅटरीच्या व्यवसायाला चालना मिळेल.

तज्ज्ञांच्या मते, बॅटरी क्षेत्रातील सर्वच शेअर्सना त्याचा मोठा फायदा होईल. यामध्ये एक्साईड इंडस्ट्रीज सध्या अग्रेसर आहे. बजेटमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा मोठा फायदा होईल. सिगरेटवर पुन्हा कर वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनटीपीसी आणि आयटीसी शेअरमध्ये उलाढाल दिसू शकते.

हे सुद्धा वाचा

आलिशान मनगटी घड्याळे, दाग-दागिने यांच्या करात बदल होऊ शकतो. टायटन आणि इतर कंपन्यांचे शेअर वधारु शकतात. सबसिडी आणि कृषी क्षेत्रातील बदलाचा परिणाम चंबल फर्टिलायझर्सच्या शेअरवर दिसून येऊ शकतो. गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

केंद्र सरकार कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानावर जोर देत आहे. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात ड्रोनचा वीपर, कृषी उत्पादनात वाढ, त्यासाठी तंत्रज्ञानावर आधारीत मशिनरींचा वापर वाढू शकतो. त्यामुळे या क्षेत्रात सबसिडी वाढू शकते. या क्षेत्रात मोठ्या घोषणेची शक्यता आहे. त्यामुळे गोदरेज अॅग्रोवेटला फायदा होऊ शकतो.

गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने रेल्वे विकासावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. हायस्पीड, सुपर स्पीड रेल्वेंचे जाळे वाढले आहेत. वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून झटपट प्रवासाचे भारतीयांचे स्वप्न साकारले आहे. या घडामोडींचा परिणाम आरव्हीएनएलच्या स्टॉकवर दिसून येईल.

टू टायर आणि थ्री टायर शहरातील पायाभूत सुविधांवर केंद्र सरकार विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे अॅल्युमिनियमच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम नॉल्कोच्या स्टॉकवर दिसून येईल. रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठा बदल होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील स्टॉकवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.

तसेच औषधी निर्माण क्षेत्रासाठी मोठी घोषणा होऊ शकते. फार्मा स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरु शकते. सिप्ला आणि इतर कंपन्या कमाई करुन देऊ शकतात. येत्या अर्थसंकल्पात या सेक्टरसाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे.

हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजाराचा अभ्यास करावा. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हा केवळ अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.