Budget 2024 : संसदेत सादर झाला अर्थसंकल्प, PDF कशी डाऊनलोड कराल ? फॉलो करा या सोप्या स्टेप्स
Budget Session 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता भाषणाचा संपूर्ण मजकूर आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. तो कसा वाचता येईल सविस्तर जाणून घेऊया.
नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. सुमारे तासभर चाललेल्या या भाषणादरम्यान सीतरमण यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणारा नाही. तसेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प केल्यानंतर आता त्यांच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर सर्वसामान्य जनेतासाठी उपलब्ध आहे.
बजेट 2024-25 हे पीडीएफ लिंकच्या मदतीने डाऊनलोड करता येऊ शकते. www.indiabudget.gov.in यावर हे संपूर्ण बजेट उपलब्ध आहे. ते येथे उपलब्ध झाल्यानंतर, आता तुम्ही डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील तपासू शकता. तो कसा डाऊनलोड करता येईल आणि वाचता येईल ते सविस्तर जाणून घेऊया.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 ची PDF कशी डाउनलोड करावी ?
अर्थसंकल्पीय भाषणाचा संपूर्ण मजकूर डाउनलोड करण्यासाठी, खालील नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा:
1) www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) बजेट स्पीच टॅबवर क्लिक करा.
3) आता त्या पेजवर उपलब्ध बजेट 2024 शीर्षकाच्या नवीन टॅबवर क्लिक करा.
4) त्यावर क्लिक केल्यावर बजेट 2024 असेल ती लिंक तुमच्यासमोर उपलब्ध असेल.
5) तेथे क्लिक करून तुम्ही PDF डाऊनलोड करू शकता.
त्याचप्रमाणे, तुम्ही 2024 चा अर्थसंकल्प‘Union Budget Mobile App’ येथूनही डाउनलोड करू शकता.
केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲप कसा डाउनलोड कराल ?
1) www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 2) उजव्या बाजूला असलेला डाउनलोड मोबाइल ॲप्लिकेशन सिलेक्ट करा. 3) त्यानंतर तुम्ही केंद्रीय बजेट ॲप डाउनलोड सेंटरवर पोहोचाल. 4) Android युजर्सनी Android ॲप बटणावर क्लिक करावे, तर iPhone किंवा iPad युजर्सनी Apple App Store चिन्ह निवडावे.
5) त्यानंतर तुम्हाला अधिकृत ॲपमध्ये केंद्रीय बजेट PDF साठी डाउनलोड लिंक सापडतील. त्यावर क्लिक करून PDF डाऊनलोड करू शकता .