Wheat Price : खूशखबर! गव्हाचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा जोरदार प्लॅन

Wheat Price : अवकाळी पावसाने अनेक पीकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बाजारात अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण मोदी सरकारने त्यावर जालीम उपाय शोधला आहे.

Wheat Price : खूशखबर! गव्हाचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा जोरदार प्लॅन
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:26 AM

नवी दिल्ली : बेमौसमी पावसाने (Unseasonal Rain) अनेकांच्या आशा-आकांक्षावर पाणी सोडले. उभ्या पिकांना अवकाळी पावसाने झटका दिला. शेतकरीच नाही तर सर्वसामान्य ग्राहकाची बैचेनी वाढली आहे. पिकं हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होण्याच्या भीतीने ग्राहकांचा जीव टांगणीला लागला आहे. यंदा उन्हाळा लवकर सुरु झाला. पण अवकाळी पावसाचा फटका बसला. गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. पण त्यामुळे बाजारातील किंमती भडकणार नाहीत. गेल्यावर्षीच गव्हाच्या किंमती (Wheat Price Hike) गगनाला भिडल्या होत्या. यंदा केंद्र सरकारने (Central Government) वेळीच उपाय योजना केल्या होत्या. नवीन गव्हाच्या जीवावर हे वर्ष निघून जाईल असा अंदाज होता. पण पावसाने गणित हुकवले. ग्राहकांना दरवाढीची झळ बसू नये यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

गव्हाच्या निर्यातीवर बंधन

या वर्षी गव्हाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध घातले. देशातंर्गत बाजारात गव्हाचा हंगामी पुरवठा कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. भारतीय अन्नधान्य महामंडळाने (FCI) खुल्या बाजारात गव्हाचा मोठा साठा आणला. त्यामुळे किंमती भडकल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

जोरदार उत्पादन

आता अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक राज्यात पावसाने डोळे वटारले. महाराष्ट्रातील अनेक भागात तर गारी पडल्या. त्यामुळे शेतातील उभे पीक आडवे झाले. असे असले तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार नसल्याचे भारतीय अन्नधान्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शोक के मीणा यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाने उत्पादनावर मोठी परिणाम होणार नाही. यंदा गव्हाचे उत्पादन 11.2 कोटी टन असेल, असा दावा त्यांनी केला.

गव्हाची खरेदी सुरु

एफसीआईने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाचे पीक आले आहे. केंद्र सरकारने त्याची खरेदी पण सुरु केली आहे. सोमवारी मध्य प्रदेशमध्ये जवळपास 10,727 टन गव्हाची खरेदी किमान आधारभूत किंमतीवर (MSP) करण्यात आली. भारत जगातील दुसरा सर्वाधिक गव्हाचे उत्पादन करणारा देश आहे. मे 2022 पासून देशात गव्हाच्या किंमती नियंत्रीत करण्यावर जोर देण्यात येत आहे.

इतक्या कोटी टन गव्हाचे उत्पादनाचा अंदाज

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदा गव्हाचे रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्र सरकारने वर्ष 2023-24 (जुलै-जून) मध्ये विक्रमी 11 कोटी 21.8 लाख टन गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात चढउतार होत असतो. पण तरीही यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल, असा दावा त्यांनी केला. अवकाळी पावसामुळे अन्नधान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. थंडीचा चांगला प्रभाव पडतो.

खुल्या बाजारातील विक्रीवर निर्बंध

गहू आणि गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढू नये, यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. त्यासाठी खुल्या बाजारात गव्हाच्या विक्री योजनेवर सध्या प्रतिबंध घालण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किंमती आटोक्यात आणण्यासाठी बफर स्टॉकमधील गहू खूल्या बाजारात आणण्यात आला होता. आता गव्हाच्या किंमती स्थिर आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंमती 30 रुपये प्रति किलो होत्या. आता त्या घसरुन 22-23 रुपये प्रति किलो झाल्याचे त्यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.