UPI Transaction : युपीआयने व्यवहारांत आतापर्यंतचे तोडले सर्व रेकॉर्ड, तुमचे पण आहे यात योगदान

UPI Transaction : युपीआयने व्यवहारांत पुन्हा एकदा हनुमान उडी घेतली आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. अर्थात यामध्ये तुम्ही युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांचे पण योगदान आहे.

UPI Transaction : युपीआयने व्यवहारांत आतापर्यंतचे तोडले सर्व रेकॉर्ड, तुमचे पण आहे यात योगदान
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 4:42 PM

नवी दिल्ली : युपीआयने व्यवहारांत (UPI Payments) पुन्हा एकदा हनुमान उडी घेतली आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. अर्थात यामध्ये तुम्ही युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांचे पण योगदान आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) गुरुवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे या वर्षात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. हा व्यवहार यावर्षी मेमध्ये 9 अब्जापर्यंत वाढला. देशात रिटेल पेमेंट आणि निपटाऱ्यासाठी असलेल्या या यंत्रणेने ट्विटरवर याविषयीची माहिती दिली. युपीआय व्यवहार वाढत असले तरी रोखीतील व्यवहारात पण वाढ होत आहे.

मोबाईलमुळे सहज व्यवहार एनपीसीआयच्या माहितीनुसार, UPI च्या माध्यमातून देशात 9 अब्जांपेक्षा अधिकचा व्यवहार झाला आहे. एनपीसीआयने मोबाईलच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करणे सोपे आणि सुविधाजनक असल्याची माहिती दिली. 9.41 अब्ज ट्रान्झॅक्नशनमध्ये 14.89 लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यातील डेटानुसार, 8.89 कोटींच्या व्यवहारात 14.07 लाख कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

युपीआयमार्फत प्रत्येक दिवशी 1 अब्ज उलाढाल मार्च दरम्यान युपीआयच्या माध्यमातून 8.68 अब्जांचा व्यवहार करण्यात आला. तर 14.10 लाख कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. गेल्या तीन महिन्यात युपीआयच्या माध्यमातून 14 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार करण्यात आला. PWC India च्या एका अहवालानुसार, 2026-27 पर्यंत प्रत्येक दिवशी 1 अब्ज रुपयांची उलाढाल युपीआयमार्फत करण्यात येईल. त्यामुळे रिटेल पेमेंट 90 टक्के होईल.

2026-27 पर्यंत 379 अब्जांचा व्यवहार “द इंडियन पेमेंट्स हँडबुक – 2022-27” मध्ये एक अहवाल आहे. त्यात 2022-23 या कालावधीत एकूण व्यवहारात युपीआयचा वाटा 75 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय डिजिटल पेमेंटच्या सीएजीआरमध्ये 50 टक्क्यांची स्थिर वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 103 दशलक्षांचे व्यवहार झाले. आता आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 411 दशलक्षांची उलाढाल होऊ शकते. 2027 पर्यंत प्रत्येक दिवशी 1 अब्ज डॉलरची विक्रमी उलाढाल होईल. 2026-27 पर्यंत 379 अब्जांचा व्यवहार होईल.

क्रेडिट कार्ड ठरेल राजा रिपोर्टनुसार, क्रेडिट कार्ड युपीआयसोबत जोडल्या गेल्याने डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डमार्फत व्यवहार वाढतील. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत क्रेडिट कार्डच्या मदतीने डेबिट कार्डपेक्षा अधिक व्यवहार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अहवालानुसार, क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर पुढील पाच वर्षांत सीएजीआर 21 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तर डेबिट कार्डचा सीएजीआर 3 टक्क्यांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

व्यवहाराची मर्यादा किती NPCI नुसार दररोज 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. परंतु, बिल पेमेंट आणि व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. तर बँकिंग व्यवहार करताना, रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी मर्यादा आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 25,000 ते 1 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करता येते. काही बँकांनी दैनंदिन ऐवजी आठवड्याची आणि महिन्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार, एचडीएफसी महिन्याकाठी 30 लाख रुपये हस्तांतरणाची परवानगी देते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.