Federal Reserve: 11,645 किमी अंतर, एक निर्णय, अनेक परिणाम..शेअर बाजारात ट्रेलर, भारतीय बाजारपेठेत दिसरणार पिक्चर..

Federal Reserve: अमेरिकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी निर्णय घेतला, त्याचा परिणाम भारतावर होत आहे..

Federal Reserve: 11,645 किमी अंतर, एक निर्णय, अनेक परिणाम..शेअर बाजारात ट्रेलर, भारतीय बाजारपेठेत दिसरणार पिक्चर..
महागाईचा पुन्हा मार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 2:48 PM

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अर्थव्यवस्था (World Economy) महागाई आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. विकसनशील तर सोडाच पण विकसीत राष्ट्रेही महागाईने (Inflation) हैराण झाली आहेत. त्यातच अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न भारतातील ग्राहकांसाठी (Indian Consumer) तापदायक ठरण्याची शक्यता आहे, कसे? ते पाहुयात..

अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या प्रयत्नांना काही केल्या यश मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक तिमाहीपासून बँक महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढीचे आक्रमक धोरण राबवित आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्य या धोरणामुळे व्याजदर 2008 सालापेक्षाही जास्त गेला आहे. पण महागाई आटोक्यात येण्याचे काही नाही. बुधवारी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पुन्हा 0.75 टक्क्यांची वाढ केली.

हे सुद्धा वाचा

व्याजदरात चौथ्यांदा ही वाढ करण्यात आली. त्यामुळे व्याजदर वाढून आता 4 टक्क्यांवर पोहचला आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी इशारा दिल्याप्रमाणे, ही शेवटची वृद्धी असू शकते.

अर्थात या निर्णयाचा जोरदार फटका जगभरातील शेअर बाजारावर पडला. अमेरिकन शेअर बाजारात धमाका झाल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार धडाधड कोसळले.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) 250 अंकांनी घसरला. तर निफ्टी (Nifty) मध्येही मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर बाजारात काही बदल दिसून आला. बाजारात सुधारणा झाली.

अमेरिकेचा ग्राहक महागाई निर्देशांक 8.2 टक्के आहे. सप्टेंबर महिन्यातील हा आकडा आहे. त्यात मामूली घसरण झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात हा निर्देशांक 8.3 टक्के होता. महागाईने गेल्या चार दशकातील रेकॉर्ड तोडले आहेत.

अमेरिकेच्या या उपाय योजनेतनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेवरही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोठा दबाव वाढला आहे. त्यामुळे दूर 11,645 किमी अंतरावर घडलेल्या घडामोडीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या होणार आहे.

भारताच्या आयातीवर त्याचा थेट परिणाम दिसून येईल. पूर्वीपेक्षा जास्त भावाने वस्तूंची खरेदी करावी लागणार आहे. अमेरिकन निर्यातीवर त्याचा परिणाम दिसून येईल. आरबीआयने पुन्हा रेपो दर वाढवला तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर दिसून येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.