Russia : रशियाशी केलेल्या या सौद्यातून भारताला होणार फायदा, अमेरिकन अर्थमंत्र्यांचा दावा
Russia : रशियासोबत भारताचे व्यापारी संबंध सर्वश्रूत आहे, त्याचे कौतूक आता अमेरिकन अर्थमंत्र्यांना वाटत आहे.
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगाने रशियाशी संबंध तोडले आहेत. पण जागतिक दबावापुढे न झुकता भारताने रशियासोबतचे व्यापारी संबंध कायम ठेवले आहे. भारताने रशियाकडून कच्चे तेल (Crude Oil) आयातीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा झाला आहे. हे संबंध वाढू नये यासाठी दबाव असतानाही अमेरिकेला या कुटनीतीचे कौतूक आहे.
अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन (Janet Yellen) या भारताच्या दौऱ्यावर येत आहे. रशियावर दबाव तयार करण्यासाठी अमेरिका सध्या आघाडीवर आहे. त्यातच भारत कोणालाही न जुमानता रशियाकडून कच्चे तेल आयात करत आहे. त्याचा फायदा भारताला नक्की होईल असा दावा अमेरिकन अर्थमंत्र्यांना वाटत आहे.
युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा रशिया फायदा उठविण्याची भीती अमेरिकाला आहे. फायद्याची रक्कम रशिया पुन्हा युद्धासाठी खर्च करण्याची भीती अमेरिकेला आहे. पण भारताच्या बाबातीत रशियाने हे धोरण आखले नाही.
कच्च्या तेलाच्या किंमतीची मर्यादा (Russian oil price cap) रशियाने घातली. या निर्णयाचा अर्थात मोठा आर्थिक फायदा भारताला होणार आहे. कारण अशा युद्धजन्य आणि चोहोबाजूंनी निर्बंध लादलेल्या रशियाकडून भारतच कच्चे तेल आयात करत आहे.
भारताने या वर्षी मार्च पर्यंत रशियाकडून केवळ 0.2 टक्के इंधन मागविले होते. याच दरम्यान रशिया-युक्रेन युद्ध पेटले. त्यानंतर भारताने रशियाकडे इंधनाची मोठी मागणी नोंदविली. सध्या कच्चे तेल आयातीत भारताचा वाटा 22 टक्के इतका वाढला आहे.
अमेरिका आणि G7 देशांचे लक्ष्य रशियाला कोणत्याही सौद्यातून फायदा न होऊ देण्याचे आहे. त्यासाठी रशियाची नाकाबंदी सुरु आहे. पण भारत सातत्याने रशियाकडून कच्चे तेल आयात करत आहे. रशिया भारताला इतर देशांच्या मानाने स्वस्तात कच्चे तेल उपलब्ध करुन देत आहे.
रशियाकडून जागतिक बाजारात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहण्याची वकिली येलेन यांनी केली आहे. पण युद्धाचा गैरलाभ रशियाला मिळू नये यासाठीही अमेरिका रणनीती आखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारताला या सौद्यातून स्वस्तात इंधन मिळत असल्याने फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकन अर्थमंत्री जेनेट येलेन या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी त्या विविध विषयांवर चर्चा करतील. अमेरिका भारताला व्यापारात सवलती देण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.