UPI Lite : एकदम झक्कास, युपीआय लाईटमध्ये बदल असा झाला खास, कायमची संपली ही कटकट

UPI Lite : भारतीय केंद्रीय बँकेने युपीआय लाईटमध्ये मोठा बदल केला आहे. हा एक बदल युपीआय लाईटचे भाग्य बदलेल. गाव-खेड्यात युपीआय लाईटचा वापर वाढेल. काय केला हा बदल, कसा होईल ग्राहकांना त्याचा फायदा,

UPI Lite : एकदम झक्कास, युपीआय लाईटमध्ये बदल असा झाला खास, कायमची संपली ही कटकट
सध्या युपीआयचे युग आहे. स्कॅन करा आणि पैसा पाठविण्याचा झटपट जमाना आहे. पण पैसा पाठविताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो.
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 2:02 PM

भारतीय केंद्रीय बँकेने UPI Lite ची एक किचकट बाब सोपी केली. त्यामुळे ग्राहकांचा युपीआय लाईटकडील ओढा वाढेल. ग्रामीण भागात युपीआय लाईटचा वापर वाढेल. सुरक्षितता, विश्वास आणि सुपरफास्ट या त्रिसूत्रीवर युपीआय लाईट उंच झेप घेईल. तर युपीआय लाईटमध्ये एक बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांचा एक मनस्ताप कमी होणार आहे. त्याला युपीआय लाईटसाठी वारंवार पैसा जमा करण्याची गरज उरणार नाही.

आपोआप पैसा जमा होणार

युपीआय लाईटमधील हा बदल म्हणायला किरकोळ वाटतो. पण त्याचा मोठा परिणाम आगामी काळात दिसेल. जर युपीआय लाईटमधील पैसे कमी झाले तर ते आपोआप जमा होतील. अर्थात त्यापूर्वी तुमची परवानगी घेण्यात येईल. आरबीआयच्या या बदलामुळे वारंवार पैसा जमा करण्याची झंझट कमी होईल. बॅलन्स रक्कम कमी झाली की लाईटमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसा जमा होईल. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल.

हे सुद्धा वाचा

बैठकीत झाला फैसला

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय लाईटचा वाढता वापर पाहुन यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. ई-मेंडेट फ्रेमवर्कअंतर्गत त्यात बदल होईल. एका निश्चित रक्कमेपेक्षा वॅलेटमधील पैसा कमी झाला तर ही रक्कम आपोआप वाढेल. किमान मर्यादेपेक्षा रक्कम कमी झाली की आपोआप रक्कम वाढण्यासंबंधीचा अलर्ट येईल. त्यावर क्लिक करताच रक्कम वॅलेटमध्ये जमा होईल. ही सेवा आपोआपो सुरु होणार नाही. युझरला ही सेवा सुरु करावी लागेल.

काय आहे UPI लाईट?

UPI लाईट सप्टेंबर 2022 मध्ये आणण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. गल्ली-बोळातील दुकानदारांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत युपीआय आहे. त्यातून दिवसाकाठी मोठ्या रक्कमेची उलाढाल होते. छोट्या रक्कमेसाठी आरबीआयने युपीआय लाईट बाजारात आणले होते. त्याला पण नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. युपीआय लाईटच्या माध्यमातून ग्राहक 500 रुपयांपेक्षा कमी पेमेंट करु शकतो. या रक्कमेपर्यंत त्याला व्यवहार करता येऊ शकतो.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.