Valentine Day : गुलाबाच्या किंमती सूसाट, प्रेमवीरांना बसणार ‘रोझ डे’ लाच शॉक!

Rose Day : व्हॅलेंटाईन आठवडा सुरु झाला आहे. तरुणाईला प्रेमाचे भरते आले आहे. पण या प्रेमालाही महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. प्रत्येक गिफ्ट खिशाला झळ देणारंच आहे.

Valentine Day : गुलाबाच्या किंमती सूसाट, प्रेमवीरांना बसणार 'रोझ डे' लाच शॉक!
किंमतींचा झटका
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली : तरुणाईच नाही तर प्रत्येक वयातील व्यक्ती ज्या आठवड्याचा अधीरतेने वाट पाहता, तो व्हॅलेंटाईन आठवडा (Valentine Week) अखेर सुरु झाला आहे. युगुलांच्या प्रेमांला भरते आले आहे. प्रत्येक जण एकमेकांना, आपल्या पार्टनर इन क्राईमला काय गिफ्ट द्यायचे याची योजना आखत आहे. पण त्यांच्या उत्साहावर यंदा महागाईचे सावट आहे. महागाईच्या झळा यंदा ही प्रेमवीरांना बसणार आहे. मंगळवार, 7 फेब्रुवारीपासून, व्हॅलेंटाईन आठवडा सुरु होत आहे. संपूर्ण भारतात अचानक फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे किंमती भडकल्या आहेत. विशेषतः गुलाबाच्या किंमती (Rose Price) वाढल्या आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यामुळे सजावट करणाऱ्या फुलांचीही मागणी वाढली आहे. यंदा उत्तरेसह उर्वरीत भारतातही जोरदार थंडी होती. पण फुलांचे उत्पादन कमीच राहिले. त्यामुळे गुलाब आणि इतर सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांच्या किंमतीत जोरदार वाढ (Flower Price Hike) झाली. फुलांचे भाव 40 ते 50 टक्के वाढले आहेत.

द हिंदू या दैनिकाने फुलांच्या किंमतीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, जानेवारीत लग्न सोहळे सुरु झाले. त्यामुळे घर, मंदिर, लग्न हॉल या ठिकाणी सजावटीच्या फुलांची मागणी वाढली होती. विशेषतः मकर संक्रांतीनंतर सर्वच फुलांच्या किंमतीत अचानक मोठी वाढ झाली.

गुलाबाचे एक फुल साधारणपणे 4 वा 5 रुपयांना मिळते. पण आता लग्न सोहळा आणि व्हॅलेंटाईन आठवड्याने मागणी वाढली. आता एका गुलाबाच्या फुलासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहे. हा भाव या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

साऊथ इंडिया फ्लोरीकल्चर असोसिएशनचे संचालक श्रीकांत बोल्लापल्ली यांनी फुलांच्या किंमतींविषयी अंदाड वर्तविला आहे. त्यानुसार, सर्वंच फुलांच्या किंमतीत साधारणपणे, 10 ते 20% टक्क्यांची वृद्धी होईल. त्यामुळे प्रेमात व्यवहाराचे गणित मांडायचं नसते, असे म्हणत प्रेमवीरांना हे भाववाढीचे चटके सहन करावे लागतील.

बंगळुरु आणि त्याच्या जवळपास बागलूर, चिकबल्लापूर, डोड्डाबल्लापूर, अत्तिबेले आणि होसकाटे या ठिकाणच्या गुलाबांना विशेष मागणी आहे. बंगळुरु हे देशातील गुलाब हब आहे. येथील गुलाब देशातच नाही तर विदेशातही निर्यात होतात.

बंगळुरुच्या गुलाबाच्या काही जाती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामध्ये सामान्य गुलाबाप्रमाणेच ताजमहल या जातीचा गुलाब अत्यंत लोकप्रिय आहे. त्याला सर्वाधिक मागणी आहे. मोठ्या फुलदानीची हे गुलाब शोभा वाढवितात. तसेच प्रेमवीरांना हे टोपरे गुलाब देण्यातही विशेष रस असतो.

कर्नाटक स्टेट एक्सोटिक फ्लावर ग्रोअर्स अँड सेलर्स असोसिएशनचे महासचिव मोहम्मद युसूफ यांनी दरवाढीचे कारण सांगितले. त्यानुसार, यंदा थंडीचा परिणाम फुलांवर झाला. थंडीमुळे फुलांच्या कळ्या फुलल्या नाही.

तर काही ठिकाणी गुलाबावर आणि इतर फुलांवर डाऊन मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्याचा उत्पादनाला फटका बसला. गुलाबाच्या उत्पादनात 60 ते 70% घसरण झाली. त्यामुळे किंमतीत मोठी वाढ होणार आहे. त्याचा फटका प्रेमवीरांना बसेल.

गुलाबाव्यतिरिक्त जरबेराचा घड 30 ते 40 रुपयांपर्यंत मिळत होता. आता हा घड 60 रुपयांना मिळेल. तर सजावटीच्या झेंडूच्या किंमतीही वाढल्या आहेत. आता झेंडूचा घड 200 ते 300 रुपयांना मिळत आहे. पूर्वी हा भाव अवघा 150 रुपये होता.

पण बाजारात फुलांनाही पर्याय मिळाला आहे. प्लास्टिक आणि कागदी फुलांचीही रेलचेल दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते चिंतेत आहे. जास्त भावामुळे काही जण प्लास्टिक अथवा कागदी आणि नवीन आर्टिफिशिअल फुलांचा उपयोग वाढू शकतो. त्याचा फटका शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांना बसेल.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.