Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat : वंदे भारत करेल मालामाल, 6 महिन्यांत पैसा केला डबल, तुम्ही गुंतवणूक केली का

Vande Bharat : तुम्हाला प्रश्न पडला असेल की, वंदे भारत कशी मालामाल करु शकते, नाही का? तर त्यासाठी तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करणे गरजेचे आहे..

Vande Bharat : वंदे भारत करेल मालामाल, 6 महिन्यांत पैसा केला डबल, तुम्ही गुंतवणूक केली का
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 2:26 PM

नवी दिल्ली : वंदे भारत (Vande Bharat) रेल्वेने भारतात वेगवान प्रवासाचे युग अवतरले आहे. यापूर्वी काही सुपर एक्सप्रेस होत्या. पण वंदे भारत ही आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधांनी युक्त आहे. सध्या भारतात एकूण 17 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आज 11 जून रोजी पटना-रांची वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी होत आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती. वंदे भारत रेल्वेचा प्रवास अद्भूत आणि आलिशान आहे. आता तुम्ही या प्रवासासोबत कमाई सुद्धा करु शकता. तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये (Share) गुंतवणूक केली असेल तर मालामाल होता येईल.

टिटागड वॅगन्स तर टिटागड वॅगन्स (Titagarh Wagons) ही ती कंपनी आहे. या कंपनीला 80 वंदे भारत ट्रेन तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीची निधी जमा करण्यासाठी कालच 10 जून रोजी विशेष बैठक झाली. कंपनी अजून फंड जमा करत असल्याची माहिती गुंतवणूकदारांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली. या कंपनीचा एक शेअर 8 टक्क्यांनी वधारला. कंपनीचा इंट्रा-डे हाय 427 रुपये प्रति शेअर होता.

कामाचा नाही कमी Titagarh Wagons ने या बैठकीची माहिती शेअर बाजाराला कळवली होती. या बैठकीत निधी जमा करण्यासाठी परवानगी घेण्यात येणार होती. वंदे भारत ट्रेन निर्मितीसह या कंपनीला 24,177 रेल्वे डब्बे तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. याचे बजेट जवळपास 7800 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

शेअरमध्ये 25 टक्के वाढ गेल्या एका महिन्यात Titagarh Wagons कंपनीचे शेअर 25 टक्क्यांनी वधारले आहेत. 6 महिन्यापूर्वी या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. सहा महिन्यातच त्यांचा पैसा डबल झाला आहे. दामदुप्पट योजनेत किती वर्षांनतर परतावा मिळतो, हे सर्वांनाच माहिती आहे. या कंपनीने सहा महिन्यातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

एका वर्षात असा दिला परतावा ज्या गुंतवणूकदारांनी Titagarh Wagons चे शेअर एक वर्षापूर्वी खरेदी केले. त्यांना एका शेअरवर 280 टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांक 93.40 रुपये प्रति शेअर होता. तर कंपनीचा इंट्रा-डे हाय 427 रुपये प्रति शेअर आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.