200 जणांची नोकरी केली! अकार्यक्षमतेचा ठपका; वेदांतूने 200 कर्मचाऱ्यांना दिले नारळ

तंत्रज्ञानाधरीत शिक्षण फर्म वेदांतूने 200 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला आहे. कंपनीच्या वाढीच्या अपेक्षेशी सुसंगत न सापडल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकले आहे.

200 जणांची नोकरी केली! अकार्यक्षमतेचा ठपका; वेदांतूने 200 कर्मचाऱ्यांना दिले नारळ
कामावरुन काढलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 1:58 PM

तंत्रज्ञानाधारीत शिक्षण देणारी फर्म (EdTech company) वेदांतूने (Vedantu) 200 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ टेकवला आहे. या कर्मचाऱ्यांवर कंपनीने अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. कंपनीच्या वाढीच्या अपेक्षेशी सुसंगत न सापडल्यामुळे त्यांना कामावरून काढून (Lays Off) टाकले आहे. या विषयी संपर्क साधला असता, कंपनीच्या प्रवक्त्याने या निर्णयाला दुजोरा दिला आणि सांगितले की, कंपनी 1,000 हून अधिक नवीन लोकांना कामावर घेत आहे. “आमच्याकडे 6,000 हून अधिक कर्मचारी आहेत, त्यापैकी 120 कंत्राटदार आणि 80 पूर्ण-वेळ किंवा एकूण संख्येच्या 3.5 टक्के शैक्षणिक किंवा सहाय्यक शिक्षक आहेत, ज्यांचे पुनर्मूल्यांकन केले जात होते. आमचा त्यांच्याशी वार्षिक करार आहे आणि प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस, आम्ही पुनर्संतुलनाच्या प्रक्रियेचे अनुसरण करतो. आमच्या वाढीच्या अपेक्षानुरुप कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. वर्षभरातील शिक्षकांचा शिकण्याचा अनुभव आणि सातत्य हे कंपनीचे प्राधान्य असल्याने वर्षाच्या मध्यावर पुनर्मूल्यांकन करता येणार नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले.

“तंत्रज्ञानाचा अधिक हस्तक्षेप, वर्गाच्या स्वरूपाची पुनर्रचना आणि श्रेणींमध्ये बदल करून, आम्ही आमच्या शिक्षणतज्ञ आणि सहाय्यक शिक्षकांच्या या भूमिकेची चाचपणी करतो. आम्ही या वर्षासाठी आमच्या वाढीच्या उद्दीष्ट गाठत असताना, आम्ही विविध संघांमध्ये 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना देखील कामावर घेत आहोत, ज्यात समान पदांसाठी 100 हून अधिक कर्मचारी आहेत,” असे प्रवक्त्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात, तंत्रज्ञानाधारीत शिक्षण देणारी कंपनी अनअकॅडेमीने (Unacademic) सुमारे 600 कर्मचाऱ्यांना नॉन-परफॉर्मन्स आणि भूमिकेच्या अतिरेकामुळे काढून टाकले. कारण कंपनी या वर्षाच्या अखेरीस कार्यक्षमता वाढविण्यावर आणि फायदेशीर व्यवसाय करण्यावर भर देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vedantu (@vedantu_learns)

वेदांतू हा तिसरा एडटेक स्टार्टअप आहे, ज्याने 2021 मध्ये Eruditus आणि UpGrad सह युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला. मिंटच्या (Mint) अहवालानुसार, 2023-24 मध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) होण्यापूर्वी कंपनी जागतिक पातळीवर नवीन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. गेल्याच महिन्यात, Unacademy ने 600 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला होता.

View this post on Instagram

A post shared by Vedantu (@vedantu_learns)

दूरस्थ शिक्षणाच्या मागणीतील वाढीमुळे गेल्या दोन वर्षांत एडटेक क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे, यामुळे तीव्र स्पर्धा देखील निर्माण झाली आहे, ज्यामुळे काही छोट्या कंपन्यांच्या संभाव्यतेला फटका बसला आहे. लिडो लर्निंगने सारख्या उगवत्या कंपन्यांना या गळेकापू स्पर्धेत टिकून राहता आले नाही. कंपनीने मार्च महिन्यात सर्व कारभार गुंडाळण्यापूर्वी आपल्या 1,200 हून कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.