टोमॅटोच्या महागाईचा व्हेज थालीला जबर फटका, एका महिन्यातच इतके टक्के महागले हॉटेलचे जेवण

क्रिसिल ( क्रेडीट रेटींग इन्फॉर्मेशन सर्व्हीस ऑफ इंडीया ) ही संस्था उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील प्रचलित किंमतींआधारे घरी महागाईची गणना करीत असते.

टोमॅटोच्या महागाईचा व्हेज थालीला जबर फटका, एका महिन्यातच इतके टक्के महागले हॉटेलचे जेवण
veg-thaliImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:48 PM

नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या महागाईची कुऱ्हाड स्वयंपाक घरासह हॉटेलच्या राईसप्लेटवरही कोसळली आहे. टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्याने व्हेज थाली महिन्याभरातच 34 टक्के महागली आहे. फूड प्लेट कॉस्टची मासिक इंडीकेटर संस्था क्रिसिलने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनूसार व्हेज थाळीची किंमत जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये 34 टक्के वाढली आहे. व्हेज थाळीच्या वाढत्या दराला 25 टक्के टोमॅटोचे वाढलेले दर कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. जून महिन्याते टोमॅटो 33 रुपये प्रति किलोग्रॅम असलेले टोमॅटोची किंमत तब्बल 233 टक्के वाढून 110 रुपय प्रति किलोग्रॅम पोहचली आहे.

तिसऱ्यांदा महागली थाळी 

लागोपाट तिसऱ्या महिन्यात व्हेज थालीचे दर क्रमिक रुपाने मासिक आधारे वाढले आहेत. साल 2023-24 आर्थिक वर्षांत प्रथमच व्हेज थालीचे दर वार्षिक आधारावर वाढले आहेत. नॉनव्हेज थालीचे दरही वाढले आहेत. मासिक आधारे नॉन व्हेज थाली गेल्या महिन्यापेक्षा 13 टक्के महागली आहे.

क्रिसिल ही संस्था काय काम करते

क्रिसिल ( क्रेडीट रेटींग इन्फॉर्मेशन सर्व्हीस ऑफ इंडीया ) ही संस्था उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील प्रचलित किंमतींआधारे घरी थाली तयार करण्यासाठी लागणाऱ्या सरासरी खर्चाच्या आधारे गणना करते. मासिक बदल झाल्यास सर्वसामान्यांना याची लागलीच झळ पोहचते. डेटानूसार अन्नधान्य, डाळी, ब्रॉयलर चिकन, भाज्या, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सह त्या सामुग्रीच्या किंमतीचा पत्ता लागतो ज्यामुळे थालीच्या किंमतीत बदल होतो.

नॉन व्हेज थाळीही महागली पण

नॉन व्हेज थाळीचे किंमत देखील वाढली आहे. परंतू तिचा वेग कमी आहे. कारण जुलैमध्ये ब्रॉयलरची किंमतीत 3-5 टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. नॉनव्हेज थाळीत ब्रॉयलरचा प्रभाव 50 टक्के इतका आहे.

सर्वसाधारणपणे व्हेज थालीत डाळ, चपाती, भाजी ( कांदा, टोमॅटो आणि बटाटा ) दही आणि सलाडचा समावेश असतो. नॉनव्हेज थाळीत डाळीच्या जागी चिकनचा समावेश केला आहे. क्रिसिलने आपल्या मासिक इंडीकेटर आधारे म्हटले आहे की कांदा आणि बटाट्याच्या किंमतीत मासिक आधारावर अनुक्रमे 16 टक्के आणि 9 टक्के वाढ झाली आहे.

मिरची आणि जिरेही महागले

मसाल्यात मिरची आणि जिरे याचेही भाव कडाडले आहेत. जुलैमध्ये मिरची 69 टक्के आणि जिरे 16 टक्के महागले आहे. क्रिसिलने ( crisil ) म्हटले आहे की थालीत हे जिन्नस भाज्यांच्या तुलनेत कमी वापरले जातात. क्रिसिलने म्हटले आहे की खाद्य तेलांचे भाव थोडे 2 टक्के कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.