धूत कुटुंबाकडून ‘व्हिडीओकॉन’ निसटले, नवे मालक कोण?

अब्जाधीश व्यावसायिक अनिल अग्रवाल यांच्या 'ट्विन स्टार टेक्नॉलॉजीस' कंपनीची बोली मंजूर झाली

धूत कुटुंबाकडून 'व्हिडीओकॉन' निसटले, नवे मालक कोण?
व्हिडिओकॉनच्या कर्जदारांना नवीन कंपनीत मिळणार 8% हिस्सा
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 8:36 AM

नवी दिल्ली : कर्जात बुडालेल्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजला (Videocon Industries) अखेर नवे मालक मिळाले आहेत. कर्जदारांनी दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत (insolvency resolution process) अब्जाधीश व्यावसायिक अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांच्या कुटुंबाद्वारे संचालित ‘ट्विन स्टार टेक्नॉलॉजीस’ या कंपनीची (Twin Star Technologies) बोली मंजूर केली. त्यामुळे राजकुमार धूत यांच्याऐवजी वेदांता ग्रुपकडे व्हिडीओकॉनची मालकी असेल. (Videocon lenders approve Twin Star Technologies bid)

बोलीची रक्कम गुलदस्त्यात

व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने स्टॉक मार्केटला पाठवलेल्या न्यायालयीन सूचनेत ही माहिती दिली आहे की, ठराव योजना आता विधी न्यायाधिकरणासमोर मान्यतेसाठी सादर केली जाईल. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या कमिटी ऑफ क्रेडीटर्स (सीओसी) किंवा कर्जदार समितीने ग्रुपच्या 13 समूह कंपन्यांसाठी ट्विन स्टार टेक्नॉलॉजीसच्या समाधान योजनेच्या (सोल्यूशन प्लॅन) बाजूने 95 टक्के मतदान केले. मात्र व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने पाठवलेल्या नियामक सूचनेत ट्विन स्टार टेक्नॉलॉजीसने लावलेल्या बोलीच्या रकमेविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

धूत कुटुंबाची ऑफर नाकारली

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडवर बँकांचे 31,000 कोटींचे सव्याज कर्ज आहे. यापूर्वी व्हिडिओकॉन गटाच्या 13 कंपन्यांना दिवाळखोरी प्रक्रियेमधून बाहेर काढता यावे, यासाठी व्हिडिओकॉनची स्थापना करणाऱ्या धूत कुटुंबाने कर्जदारांना 30,000 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती. मात्र कर्ज देणार्‍या बँकांच्या समितीने वेदांत समूहाची ऑफर मान्य केली. वेदांत समूहाने त्यांच्या एका सहाय्यक कंपनीमार्फत समाधान योजना सादर केली होती. (Videocon lenders approve Twin Star Technologies bid)

वेदांता ग्रुपला रस का?

रावा तेल क्षेत्रात 25 टक्के हिस्सेदारी दिल्यामुळे व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांमध्ये वेदांता ग्रुपला रस आहे. या अधिग्रहणानंतर वेदांताची रावा तेल क्षेत्रात 47.5 टक्के हिस्सेदारी होईल. त्यामुळे ओएनजीसीच्या 40 टक्के भागीदारीपेक्षा त्यांचे मोठे भागभांडवल होईल.

इतर बातम्या 

आता हाफ तिकीट विमानप्रवास, एअर इंडियाचं ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट

रुपे कार्डधारकांसाठी Good News; आता इंटरनेटशिवाय ‘असे’ काढता येणार पैसे

कोरोनामुळे नोकरी गेलीय? बिझनेस सुरु करण्यासाठी सोनू सूदचा मदतीचा हात!

(Videocon lenders approve Twin Star Technologies bid)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.