Vinod Kambli : एक कॉल अन् बँक खाते झाले रिकामे; अनेक धक्के पचवणाऱ्या विनोद कांबळी यांना सायबर भामट्यांनी सुद्धा सोडले नाही
Vinod Kambli Online Fraud And Scam : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यांचे करिअर अनेक संकटांनी भरलेले आहे. क्रिकेट असो वा आर्थिक स्थिती दोन्हीत त्याला सातत्य टिकवता आले नाही. आर्थिक तंगी असतानाच त्यांना सायबर भामट्यांनी फटका दिला.
कधीकाळी कोट्यवधींची कमाई करणाऱ्या विनोद कांबळी यांना आता हजार रुपयांवर दिवस काढावे लागत आहेत. क्रिकेट आणि आर्थिक स्थैर्य टिकवता आले नाही. त्यांना राजाचा रंक करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याच्या जीवनात अनेकदा उलथापालथ झाल्याचे दिसते. कांबळी हा दीर्घकाळापासून तंगीचा सामना करत आहे. काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी हा ऑनलाईन फसवणुकीचा पण शिकार झाला होता. एका कॉलने त्याचे बँक खाते खाली झाले होते. त्याच्या खात्यातील मोठी रक्कम गायब झाली होती. काय आहे तो किस्सा? कसा बसला विनोद कांबळी याला फटका?
सायबर भामट्यांनी घातला गंडा
विनोद कांबळी याला काही वर्षांपूर्वी सायबर भामट्यांनी गंडा घातला होता. कांबळी याला सायबर गुन्हेगारांनी एक लाख रुपयांचा चुना लावला होता. सायबर गुन्हेगारांनी, कांबळी याला बँकेतील अधिकारी असल्याची थाप मारली होती. त्यानंतर त्याला एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर त्याला अपडेट करण्यास सांगण्यात आले. कांबळीने लिंकवर क्लिक करतानाच एक ओटीपी शेअर करण्यास सांगण्यात आले. त्याच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. गुन्हेगारांनी त्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले.
कांबळीला 30 हजारांची पेन्शन
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (BCCI) विनोद कांबळी याला 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. या पेन्शनवरच त्याला दिवस काढावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात ही रक्कम त्याला पुरत नाही. निवृत्ती रक्कमेनुसार त्याला दिवसाला एक हजार रुपये दिवसाकाठी मिळत असल्याचे दिसते.
तुम्ही नका होऊ शिकार
ऑनलाईन स्कॅम हा ई-मेल, सोशल मिडिया, टेक्स्ट मॅसेज आणि फोन कॉल यांच्या माध्यमातून करण्यात येतो.
या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुमच्या खात्याला पासवर्ड सेट करा. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनची अगोदर खात्री करा. त्याची सविस्तर माहिती घ्या.
कुणालाही तुमचा पासवर्ड, ओटीपी शेअर करू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. तिथे तुमची सविस्तर माहिती देऊ नका. नेहमी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) इनेबल करा.
पब्लिक WiFi चा वापर करत असाल तर सावधान राहा. तुमची वैयक्तिक माहिती कुठेही शेअर करु नका. अँटीवायरस सॉफ्टवेअर आणि ॲप तुमच्या फोनमध्ये जरूर ठेवा. अनोळखी व्यक्तीचा कॉल, मॅसेज टाळा. सोशल मीडियावरील लिंक्स, पेजवर तुमची माहिती शेअर करू नका.
अनोळखी कॉल आल्यास त्वरीत त्याची माहिती संबंधित बँकेला द्या. अशा कॉलवर जास्तवेळ संवाद साधू नका.