Vairal Bonus News : या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तिकिट न काढताच बंपर लॉटरी, बोनस रुपात मिळाले इतक्या वर्षांचे वेतन
Viral Bonus News : या कंपनीने कर्मचाऱ्यांना एकदम मालामाल केले.
नवी दिल्ली : काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्षांच्या अखेरीस बोनस (Year-end Bonuses) देतात. साधारणपणे हे बोनस एका महिन्याच्या पगारा इतके असते. पण जर तुम्हाला बोनस म्हणून 4 वर्षांचा पगार मिळाला तर? आणि तोही एकरक्कमी. कर्मचारी तर रातोरात श्रीमंत होतील. तर एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा मोठा सूखद धक्का दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तिकिट न काढताच बंपर लॉटरी (Bumper Lottery) लागली. कंपनीच्या या नवीन वर्षातील सरप्राईज गिफ्टमुळे कर्मचारी भावूक झाले. त्यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता.
तर ही कंपनी तायवान येथील आहे. एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन (Evergreen Marine Corporation) या कंपनीने कर्मचाऱ्यांना हे जोरदार पॅकेज दिले आहे. ही शिपिंग इंडस्ट्री कंपनी आहे. कंपनीने त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना इयर-एंडची अनोखी भेट दिली आहे.
तायवानच्या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्षांच्या शेवटी जोरदार भेट दिली. या कंपनीने काही कर्मचाऱ्यांना 50 महिन्यांचे वेतन भेट म्हणून दिले. कंपनीने याला स्टेलर बोनस असे नाव दिले आहे. 2022 मध्ये कंपनीची व्यावसायिक आणि व्यापारात मोठी भरभराट झाली.
कंपनीला सरत्या वर्षात मोठा फायदा झाला. हा नफा कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंपनीने काही कर्मचाऱ्यांना थोडा थोडका नाहीतर 50 महिन्यांचा पगार एकरक्कमी देण्याचा निर्णय घेतला. स्टेलर बोनस नावाने कंपनीने त्याचे वाटप केले.
50 महिन्यांच्या वेतनामुळे अर्थातच कर्मचारी जाम खूश आहेत. त्यांनी कंपनी एवढा भलामोठा बोनस देईल, याची कल्पना केली नव्हती. जे सध्या तायवानमध्ये काम करत आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात आला आहे. कामाच्या आधारावर, कामगिरीवर हा बोनस देण्यात आला आहे.
तायवानमधील इकोनॉमिक डेली न्यूज रिपोर्टमध्ये याविषयीची माहिती देण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरी आधारे बोनस देण्यात आल्याचे म्हटले आहे. काही कर्मचाऱ्यांना तर 65,000 डॉलर हून अधिकची रक्कम मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
एव्हरग्रीन मरीन ही तीच कंपनी आहे, जिचे जहाज 2021 मध्ये सुवेझ कालव्यात फसले होते आणि त्याची मोठी बातमी आंतरराष्ट्रीय मीडियात झळकली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये 2021 मध्ये 250 टक्के वाढ झाली होती. तर सरत्या वर्षात शेअरमध्ये 54 टक्क्यांची घसरण झाली.