विराट-अनुष्काला लागली लॉटरी, Go Digit IPO मुळे छप्परफाड कमाई

Virat Kohli-Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना लॉटरी लागली आहे. गो डिजिट कंपनीच्या शेअरची बाजारात एंट्री झाली आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून 5.15 टक्क्यांचा फायदा झाला आहे. या सेलेब्रिटी जोडीला या गुंतवणुकीतून 9.5 कोटींचा फायदा झाला आहे.

विराट-अनुष्काला लागली लॉटरी, Go Digit IPO मुळे छप्परफाड कमाई
छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 11:31 AM

दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड तारका अनुष्का शर्मा या जोडीने गो डिजिट कंपनीत गुंतवणूक केली होती. या कंपनीचा शेअर, बाजारात सूचीबद्ध झाला आहे. त्यामाध्यमातून या दोघांना तगडी कमाई झाली आहे. या दोघांनी 9 कोटी रुपये छापले. गो डिजिटच्या आयपीओला एकूणच 9 पटीहून अधिकची बोली लागली होती. कंपनीचा शेअर 272 रुपये किंमतीला देण्यात आले. आज BSE वर त्याची किंमत 281.10 रुपये आणि NSE वर 286 रुपयांवर एंट्री झाली. विराट-अनुष्काला ताबोडतोब 5.15 टक्के लिस्टिंग गेन मिळाला. बाजारात दाखल होताच या शेअरने उसळी घेतली. हा शेअर BSE वर 291.45 रुपयांच्या अप्पर सर्किटवर पोहचला. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना आता 7.15 टक्क्यांचा फायदा मिळाला.

विराट-अनुष्काला लागली लॉटरी

गो डिजिटने DRHP फाईल केलेले आहे. त्यानुसार, विराट कोहलीने फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपनीत 2 कोटी रुपये गुंतवले होते. त्याचे कंपनीत 2,66,667 इक्विटी शेअर आहेत. तर पत्नी अनुष्का शर्माने 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तिच्याकडे गो डिजिटचे 66,667 इक्विटी शेअर आहेत. या दोघांनी 75 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने गुंतवणूक केली होती. आता शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर या 2.50 कोटी रुपयांच्या बदल्यात त्यांना 9,53,33,524 कोटींचा रिटर्न मिळाला आहे. म्हणजे गुंतवणुकीवर 271 टक्क्यांचा तगडा रिटर्न मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

Go Digit IPO ला जोरदार प्रतिसाद

गो डिजिटने 2,614.65 कोटींच्या आयपीओसाठी बोली लावली होती. 15-17 मे दरम्यान आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी बाजारात होता. त्याला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. एकूण हा आयपीओ 9.60 पटीने सब्सक्राईब झाला. या आयपीओच्या माध्यमातून 1125 कोटी रुपयांचे नवीन शेअर बाजारात आणण्यात आले. याशिवाय 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 5,47,66,392 शेअर्स ऑफर फॉर सेल विंडोतंर्गत बाजारात आले. ऑफर फॉर सेलची रोख रक्कम शेअरधारकांना मिळाली आहे.

कंपनीची वित्तीय कामगिरी

कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे. तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये या कंपनीला 122.76 कोटींचा तोटा झाला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये तोटा 295.85 कोटींच्या घरात पोहचला. त्यानंतर कंपनीचे आर्थिक आरोग्य सुधारले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 35.54 कोटींचा फायदा झाला. गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मधील पहिल्या नऊ महिन्यांत एप्रिल ते डिसेंबर 2023 मध्ये 129.02 कोटींचा नफा झाला. कंपनीवर 200 कोटींचे कर्ज आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.