Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने उतरले झरझर, सराफा बाजारात आज अशा घसरल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोन्यात घसरण झाली असून चांदीने उसळी घेतली आहे. सोने-चांदी दबावा खाली असल्याने भावात कोणताही नवीन रेकॉर्ड झालेला नाही. सराफा बाजारात फेरफटका मारण्यापूर्वी किंमतीत किती बदल झाला हे घ्या जाणून.

Gold Silver Rate Today : सोने उतरले झरझर, सराफा बाजारात आज अशा घसरल्या किंमती
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली : तुम्हाला पण सोने-चांदीत (Gold Silver Rate Today) गुंतवणूक करायची असेल तर सध्या सुवर्णकाळ आहे. सोन्याचे भाव घसरणीवर आहे तर चांदीने थोडी उसळी घेतली आहे. सराफा बाजारात फेरफटका मारताना एकदा भाव जाणून घ्या, तुम्हाला सध्या हा फायद्याचा सौदा असेल. सोमवारी सोने 355 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आणि 59227 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोने 648 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. हा भाव 59582 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी सोने-चांदीत घसरण दिसून आली. सोमवारी चांदी 61 रुपयांनी स्वस्त होऊन 72359 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर शुक्रवारी चांदी 1358 रुपयांनी महागली होती. एक किलो चांदीसाठी 72420 रुपये मोजावे लागले होते.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवारी 24 कॅरेट सोने 59227 रुपये, 23 कॅरेट 58990 रुपये, 22 कॅरेट सोने 54252 रुपये, 18 कॅरेट 44420 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34648 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

दोन दिवसांत अशी झाली घसरण गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्यात आज 20 जून रोजी 130 रुपयांची घसरण झाली. आज या किंमती 55,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60,210 रुपये झाल्या. काल हा भाव अनुक्रमे 55,350 रुपये आणि 60,210 रुपये होता. आज दुपारनंतर किंमतीत घसरण्याचा होण्याची शक्यता आहे. पण जागतिक बाजारानुसार, सोने-चांदीत चढउतार होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.