वॉलमार्ट ‘टाटा ग्रुप’मध्ये 1.8 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची चिन्हं, अमेझॉन, रिलायन्सला टक्कर

देशातील रिटेल सेक्टर परदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होत आहे (Tata group launch new retail app).

वॉलमार्ट 'टाटा ग्रुप'मध्ये 1.8 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची चिन्हं, अमेझॉन, रिलायन्सला टक्कर
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 2:46 PM

मुंबई : देशातील रिटेल सेक्टरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होत आहे (Tata group launch new retail app). याआधी रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरसह काही परदेशी गुंतवणूकदारांनी भागीदारी खरेदी केली होती. आता टाटा ग्रुपही रिटेल क्षेत्रात उतरत असल्याने परदेशी गुंतवणूकदार शोधत आहे. टाटा ग्रुपमध्ये अमेरिकेची वॉलमार्ट कंपनी गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Tata group launch new retail app).

टाटा ग्रुप सुपर अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या वॉलमार्ट कंपनीसोबत बोलणे करत आहे. वॉलमार्ट सुपर अॅपमध्ये 20 ते 25 बिलियन डॉलर (जवळपास 1.8 लाख कोटी रुपये) ची गुंतवणूक करु शकते.

सुपर अ‍ॅपसाठी फंड जोडण्याच्या प्रक्रियेत वॉलमार्टसारख्या कंपनीचे नाव असणे मोठी गोष्ट आहे. या फंडच्या बदल्यात टाटा ग्रुप गुंतवणूकदारांना सुपर अ‍ॅपमध्ये मोठी भागीदारी देणार आहे. यापूर्वी वॉलमार्टने वर्ष 2018 मध्ये फ्लिफकार्टची 66 टक्के भागीदारी खरेदी केली होती. जर वॉलमार्टसोबत टाटाची डील झाली तर नक्कीच रिटेल सेक्टरसाठी ही चांगली गोष्ट आहे.

जॉइंट व्हेन्चरसह कंपनीची लाँचिंग होऊ शकते

टाटा ग्रुप आपला सुपर अ‍ॅप वॉलमार्टसह जॉइंट व्हेंचरच्या रुपात लाँच केला जाऊ शकते. वॉलमार्ट या व्यवहारासाठी गोल्डमॅन सॅशला इन्व्हेस्टमेंट बँकरच्या रुपात नियुक्त केले आहे. सुपर अ‍ॅपची व्हॅल्यूएशन 50 ते 60 बिलियन डॉलर होऊ शकते. वॉलमार्टशिवाय टाटा ग्रुप दुसऱ्या गुंतवणूकदारांसोबतही चर्चा करत आहे. डिसेंबरपर्यंत हा अ‍ॅप लाँच होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

अमेझॉन आणि रिलायन्सला टक्कर

रिटेल क्षेत्रात अमेझॉन सर्वात मोठा खेळाडू समजला जातो. यानंतर रिलायन्स ज्या प्रकारे आपला व्यवसाय वाढवत आहे, हे पाहून असं वाटते की, रिलायन्स अमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. आता टाटा रिटेल व्यवसायात आल्याने अमेझॉन आणि रिलायन्स समोर तिसरा प्रतिस्पर्धी उभा होणार आहे.

दरम्यान, ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट ही आहे की, स्पर्धेमुळे ग्राहकांना वस्तू स्वस्त मिळतात आणि रोजगाराची संधी वाढू शकते.

संबंधित बातम्या :

Vodafone ची धोबीपछाड, भारत सरकारविरोधात 20 हजार कोटींचा खटला जिंकला

Gold Rate | जळगावात सोन्याचे दर पुन्हा गडगडले, तोळ्याचा भाव…..

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.