Mutual Funds : हवाय बंपर रिटर्न , तर इतके वर्ष करावी लागेल म्युच्युअल फंडात बचत

Mutual Funds : म्युच्युअल फंडमधून जोरदार परतावा हवाय, तर इतके वर्षे करावी लागले गुंतवणूक

Mutual Funds : हवाय बंपर रिटर्न , तर इतके वर्ष करावी लागेल म्युच्युअल फंडात बचत
तर मिळेल चांगला परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 10:22 PM

नवी दिल्ली : म्युच्युअल फंडमधून (Mutual Funds) जोरदार परतावा हवा असेल तर निरंतर गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे. पण किती वर्षे गुंतवणुकीत सातत्य ठेवावे लागेल असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडतो. सतत म्हणजे किती वर्षे एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक करावी हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर काय आहे ते पाहुयात..

परंपरागत गुंतवणुकीपेक्षा, म्हणजे मुदत ठेव, आवर्ती ठेव योजनेपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरते. तेवढीच अल्प बचत करुन गुंतवणूकदाराला काही वर्षात मोठा फायदा घेता येतो.

परंतु, बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडातून हवा तसा बंपर रिटर्न प्राप्त होत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी हा होय. या योजनेतून जोरदार परतावा हवा असेल तर तुम्हाला अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करत असाल तरी ती किती वर्षे करावी हा मोठा प्रश्न आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजे SIP सुरु करणे आवश्यक आहे. ती जितके वर्षे चालू ठेवाल, तेवढा त्याचा फायदा अधिक होईल.

WhiteOak Capital Mutual Fund ने SIP Analysis Report मध्ये याविषयीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, SIP द्वारे केलेली गुंतवणूकच तुम्हाला अधिकचा फायदा करुन देते.

तीन वर्षांकरीता तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला सरासरी 11.9% टक्के परतावा मिळेल. तर एसआयपीद्वारे 5 वर्षांकरीता गुंतवणूक करत असाल तर सरासरी 13% टक्के परतावा सहज मिळेल.

8 आणि 10 वर्षांकरीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर क्रमशः 14.1% आणि 14.2% सरासरीने रिटर्न प्राप्त होईल. यामध्ये सर्वाधिक सरासरी परतावा हा 15 वर्षांकरीता केलेल्या गुंतवणुकीवर मिळाला आहे.

15 वर्षांच्या पुढे केलेली एसआयपी अधिक फायदेशीर ठरते. काही योजना तर 20 ते 22 टक्क्यांपर्यंत परताव्याचा दावा करतात. पण एसआयपीद्वारे कमीत कमी तीन वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मिड कॅप फंडने सर्वात चांगला परतावा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.