Bank FD : अधिक चांगल्या परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक हवी आहे?; मग या बँकांमध्ये करा एफडी, मिळेल अधिक व्याज

एफडीचे (FD) व्याज दर बऱ्याच काळापासून कमी होते. परंतु आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानं अनेक बँकांनी देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bank FD : अधिक चांगल्या परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक हवी आहे?; मग या बँकांमध्ये करा एफडी, मिळेल अधिक व्याज
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 11:57 AM

प्रियाला शेअर बाजाराची (stock market) भीती वाटते आणि म्युच्युअल फंड (Mutual funds) तिच्या पचनी पडत नाही. कमी रिस्क असलेल्या ठिकाणी तिला गुंतवणूक करायची आहे. आता बँकेतील एफडी (Bank FD) म्हणजेच मुदत ठेवीवर व्याज वाढत आहे. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या एफडीचे व्याज देखील वाढत आहे. त्यामुळे बँक एफडीमध्ये गुंतवणूक करावी की कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करावी? असा प्रश्न आता प्रियासमोर आहे. कमी रिस्कमध्ये निश्चित रिटर्न मिळतो त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणे लोक पसंत करतात.बँकेतील एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आरबीआयच्या अहवालानुसार 2020-21 मध्ये बचतीच्या स्वरुपात लोकांनी बँकेच्या एफडीमध्ये 12.27 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच सरकारच्या लघु बचत योजनांमध्ये 3.09 लाख कोटी रुपये जमा आहेत.

एफडीचे व्याजदर

एफडीचे व्याज दर बऱ्याच काळापासून कमी होते. परंतु आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानं अनेक बँकांनी देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेतून आता एफडीच्या कालवधीनुसार 5 ते 6 टक्के व्याज मिळत आहे. बँक एफडीच्या तुलनेत कॉर्पोरेट एफडीमध्ये 1.75 टक्के जास्त रिटर्न मिळतोय, बजाज फायनान्स आणि HDFC सारख्या फायनान्स कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात तीनदा व्याज दर वाढवले आहेत. SBI आता 5 वर्षांपेक्षा जास्त एफडीवर 5.50 टक्के व्याज देत आहे. तर बजाज फायनान्स 44 महिन्यांच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज देत आहे. बजाज कंपनी 33 महिन्यांच्या एफडीवर 6.95 टक्के व्याज देत आहे.PNB पाच वर्षाच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज देते. तसेच श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स सारख्याच कालावधीच्या अवधीवर 7.90 टक्के व्याज देत आहे.

हे सुद्धा वाचा

क्रेडिट रेटिंग तपासणं गरजेचं

खासगी कंपन्यांची FD निवडताना त्यांचे क्रेडिट रेटिंग तपासणं गरजेचं आहे. क्रीसील आणि इकरा सारख्या रेटिंग कंपन्या या कार्पोरेट एफडीला रेटिंग देतात. क्रेडिट रेटिंग ‘AAA’ ट्रिपल A सर्वात सुरक्षित आहे. यापेक्षा कमी रिटर्न असलेली रेटिंग म्हणजे रेटिंग एजन्सीला कंपनीवरील कर्ज स्थिति आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल चिंता आहे. काही कमी रेटिंग असणाऱ्या कंपन्या जास्त व्याज दर देतात.बहुतेक वेळा कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्यास व्याज दर कमी असतो.त्यामुळे एफडी करताना संपूर्ण खातरजमा करा. तसेच कंपनीनं एफडीवरील व्याज नियमितपणे देणं गरजेचं आहे. मागील काळात कोणताही डिफॉल्ट नसावा. तुम्हाला कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.