Mutual funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचीये?, मग जाणून घ्या गुंतवणुकीबाबतच्या ‘या’ पाच मोठ्या गैरसमजांबाबत

नव्या गुंतवणूकदारांना (investors) म्युच्युअल फंडाबद्दल संपूर्ण माहिती नसते. तसेच म्युच्युअल फंडाबद्दल गैरसमज असणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. आता म्युच्युअल फंडाबद्दल असणाऱ्या पाच गैरसमजांविषयी आपण जाणून घेऊयात.

Mutual funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचीये?, मग जाणून घ्या गुंतवणुकीबाबतच्या 'या' पाच मोठ्या गैरसमजांबाबत
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:10 AM

आजकाल अनेक जण म्युच्युअल फंडात (Mutual funds) गुंतवणूक (investment) करतात. हा ट्रेंड आता वाढत आहे. नव्या गुंतवणूकदारांना (investors) मात्र म्युच्युअल फंडाबद्दल संपूर्ण माहिती नसते. तसेच म्युच्युअल फंडाबद्दल गैरसमज असणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.आता म्युच्युअल फंडाबद्दल असणाऱ्या पाच गैरसमजांविषयी आपण जाणून घेऊयात. पहिला म्हणजे म्युच्युअल फंड हे जोखीम मुक्त असतात. म्युच्युअल फंडात कोणत्याही प्रकारची जोखीम नसते असे बऱ्याच जणांना वाटते. परंतु टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींच्या शेवटी मात्र सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असे देखील सांगण्यात येते. म्हणजेच इक्विटी मार्केट फंडात गुंतवणूक केल्यानंतर शेअर्सची किंमत कमी होते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांची नेट असेट व्हॅल्यू देखील घसरू शकते. तसेच डेट फंडातदेखील व्याजदरांचा चढ-उतारांच्या जोखीमेचा समावेश असतो. तुम्ही जास्त परताव्याची अपेक्षा ठेवल्यास जोखिमही जास्त असते.

परताव्याची हमी

फंड मॅनेजर म्युच्युअल फंडाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करत असतो असं बरेच जण विचार करतात. त्यामुळेच चांगला परतावा मिळतोय असे देखील वाटते. मात्र, यात तथ्य नाही. फंडाचा परतावा हा अंडरलाइंग सिक्युरिटी बाजारातील चढ-उतरांवर अवलंबून असतो. त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर इक्विटी फंडाचा परतावा निगेटिव्ह म्हणजेच खूप कमी असतो.

एनएव्ही

कमी NAV मध्ये गुंतवणूक केल्यास कमी तर जास्त NAV फंडापेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे बऱ्याच जणांना वाटते. पण हे खरं नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या स्कीम A च्या NFO मध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली. A स्कीमची NAV 10 रुपये आहे आणि अशाच प्रकारे तु्म्ही जुन्या स्कीम B मध्ये 20 हजार रुपये गुंतवले ज्याची NAV 20 रुपये आहे. अशाप्रकारे स्कीम A चे तुम्हाला 2 हजार युनिट्स आणि B चे 1 हजार युनिट्स मिळतात. आता या दोन्ही फंडानं एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात गुंतवणुकीत दहा टक्के वाढ झाली. यामुळे दोन्ही फंडांची NAV 10 टक्क्यांनी वाढेल म्हणजेच A आणि B फंडाची NAV 11 रुपये आणि 22 रुपये होणार.या दोन्ही स्कीममधील गुंतवणुकीची किंमत 22 हजार रुपये होणार. अशाप्रकारे या दोन्ही योजनांवर 10 टक्के परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

सर्वच फंड शेअरमध्ये गुंतवणूक करतात

जास्त परतावा मिळतो म्हणून सर्वच म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात असे सर्वांना वाटते. परंतु असं नाही, म्युच्युअल फंड इक्विटी,डेट, सरकारी रोखे आणि रिअल इस्टेट ट्रस्टमध्ये देखील गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड विविध प्रकारचे असतात.

दीर्घ कालावधीतच कमाई होणार

केवळ दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड असतात असे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. हे ही अर्धसत्य आहे. 5 किंवा अधिक वर्षांच्या कालावधीसाठी चांगला परतावा मिळतो. पण अल्प मुदतीचे फंड देखील असतात. हे फंड डेट किंवा लिक्विड फंड असतात. या फंडातून परतावा तुलनेनं कमी मिळतो.मात्र, अल्प मुदतीचा फंडाचा परतावा हा FD आणि RD पेक्षा जास्त असतो. तुमचे म्युच्युअल फंडाबद्दल असणारे सर्व गैरसमज आता दूर झाले असतीलच. म्युच्युअल फंडांबाबत ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर नियोजन करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम जमा करणं सहज शक्य होतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.