अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?

Buy land on Moon at 6000 per acre : इंटरनॅशनल लूनर सोसायटी चंद्रावरील जमीन खरेदीसंबंधी करार करते. त्यांच्या माध्यमातून सुमन देबनाथ यांनी ही चंद्रावरील जमिनीची डील केली.

अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?
चक्क चंद्रावर जमीन खरेदी!
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 6:34 PM

जमीन खरेदी (Land deal) हा चर्चेचा आहेच. जमीन कुठं घ्यायची, किती घ्यायची, किती रुपयांना घ्यायची, असे अनेक विषय यासोबत येतात. पण अवघ्या सहा हजार रुपयांत एक एकर जमीन कुठं मिळेल का? पृथ्वीवर तर इतक्या कमी किंमती जमीन (Real estate rate and plots prices on earth) मिळणं, खूपच कठीण. पण चंद्रावर जर कुणी सहा हजारात एक एकर जमीन देत असेल, तर? तर अशी डील करणं फायदेशीर आहे की नाही, याचा अर्थ आताच काढता येणं कठीण आहे. पण एकानं सहा हजार रुपयाच चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जमीन खरेदी करणारा हा इसम प्राध्यपक आहे. एका वेबसाईटनं दिलेल्या एका वृत्तानुसार, त्रिपुरातील एका इसमानं चक्क सहा हजार रुपयांत चंद्रावर एक एकर जमिनीची खरेदी केली आहे. चंद्रावरची एक एकर जमीन (One acre land on mood) खरेदी करत या प्राध्यापकानं स्वतःच स्वतःला व्हॅलेटाईन गिफ्ट दिलंय.

जमीन खरेदी करणाऱ्या या त्रिपुरातील प्राध्यापकाचं नाव आहे सुमन देबनाथ. सुमन गणिताचे प्राध्यापक आहेत. एका खासही क्लासमध्ये ते शिकवतात. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदीचे सगळे कागदपत्रही लवकरच त्यांना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कशी केली डील?

सहा हजार रुपयांत चंद्रावर जमीन खरेदी कशी केली, याचा अनुभव देखील सुमन यांनी शेअर केलाय. या सहा हजार रुपयांमध्ये शिपिंग आणि पीडीएफ चार्जदेखील घेण्यात आला आहे. एका इंटरनॅशनल लूनर सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी चंद्रावरील ही जमीन खरेदीची प्रक्रिया केली आहे.

इंटरनॅशनल लूनर सोसायटी चंद्रावरील जमीन खरेदीसंबंधी करार करते. त्यांच्या माध्यमातून सुमन देबनाथ यांनी ही चंद्रावरील जमिनीची डील केली. त्रिपुरातील सुमन देबनाथ यांच्या ओळखीच्या आणखी एका व्यक्तीनंही अशाप्रकारे जमीन घेतल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याननंतर सुमन यांनीही जमीन खरेदी केली आहे. देबनाथ यांनी म्हटलंय की अनेक सेलिब्रिटिंनीही चंद्रावर जमीन घेऊन ठेवली आहे. याचं त्यांना फार कुतूहल होतं. म्हणून त्यांनाही चंद्रावरील जमीन खरेदीचा मोह आवरला नाही.

पृथ्वीच्या तुलनेत खूपच स्वस्त

पृथ्वीवर जमिनींचे किंवा प्लॉटचे दर हे अव्वाच्या सव्वा आहेत. त्या तुलनेच चंद्रावरील जमिनीची किंमत ही खूपच कमी असल्याचा दावा सुमन देबनाथ यांनी केला आहे. अर्थात चंद्रावर जमीन खरेदी करुन तिथं घर बांधण्याचा कोणताही इरादा नसल्याचंही सुमन यांनी स्पष्ट केलंय. प्लॉटीग सिस्टमच्या माध्यमातूनच चंद्रावर जमीन खरेदी करता येते, असंही देबनाथ यांनी म्हटलंय. एक वेगळा अनुभव हवा होता, म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोप केलाय. सुमन यांच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलानं चंद्रावर जमीन घेतल्याचं कौतुक वाटतंय.

संबंधित बातम्या :

महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

7000 कोटीच्या प्रोजेक्टवरून टाटा-अदानी यांच्यात खडाजंगी! नेमके प्रकरण काय?

अत्यंत महत्वाची माहिती…गुंतवणूक करण्याच्या अगोदर जाणून घ्या व्याज उत्पन्नावर कर कसा लागू होतो!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.