Donation : या दानशुराने गरिबांसाठी खुला केला खजिना, 6125 कोटी रुपयांचे केले दान..मनाच्या श्रीमंतीने सर्वच भारावले
Donation : या व्यक्तीच्या मनाच्या श्रीमंतीने सर्वांचे मन भरून आले..
नवी दिल्ली : अरबपती वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या कुटुंबियांकडून सुरु केलेल्या धर्मादाय संस्थांकडून (Charity Organization) गरिबांना मोठ्या प्रमाणात दान (Donation) देण्यात आले आहे. दानाचा आकडा ऐकून तुमचा ऊर भरून येईल. बफे यांच्या संस्थांनी 6125 कोटी रुपयांचे दान दिले आहे. 92 वर्षांचे हे बिग बूल दरवर्षी त्यांच्या कमाईची मोठी रक्कम दान करतात. जगभरात विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना ही रक्कम देण्यात येते. त्यामाध्यमातून गरिबांसाठी (Poor) मदत करण्यात येते.
Business Today नुसार, शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आणि टॉप-10 यादीत असलेले अरबपती वॉरेन बफे 2006 सालापासून दानधर्म करतात. पाच धर्मादाय संस्थांमार्फत हे कार्य चालविले जाते. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात.
त्यांनी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी सुसान थॉम्पसन बफे फाऊंडेशन, मुलांद्वारे चालविले जाणाऱ्या तीन धर्मादाय संस्था, शेरवुड फाऊंडेशन, हॉवर्ड जी. बफे फाऊंडेशन आणि नोवो फाऊंडेशनच्या नावे त्यांनी 300,000 क्लास बी शेअर दिले आहेत.
यंदा बफे यांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या, दुसरा देणग्यांचे वाटप केले आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला 11 दशलक्ष क्लास बी शेअर, सुसान थॉम्पसन बफे फाऊंडेशनला 1.1 दशलक्ष बी शेअर आणि मुलांच्या संस्थांना 770,218 शेअर दिले आहेत.
बफे यांनी मुलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या फाऊंडेशनमध्ये सर्वाधिक देणगी दिली आहे. त्यांनी देणगी देण्याच्या पद्धतीतही बदल केला आहे. मुलांच्या चॅरिटी फर्ममध्ये त्यांनी देणगीची रक्कम वाढवली आहे.
बफे यांची पत्नी शिक्षा क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. त्यांची संस्था आणि शेरवुड फाऊंडेशन मुलांच्या शिक्षणासाठी विशेष कार्यरत आहे. त्यांचे होमटाऊन असलेल्या ओमाहा आणि आजुबाजूच्या परिसरात त्यासाठी मोठ्या योजना राबविण्यात येत आहेत.
तर देशातील गरीब शेतकऱ्यांसाठीही या संस्था अर्थसहाय्य पुरवितात. उत्पादन वाढीसाठी विशेष मदत करण्यात येते. तसेच महिलांविरोधातील हिंसेच्या घटना रोखण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यात येते.