Uday Samant on local scheme | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह मोठ्या प्रमाणावर आमदारांनी(MLA) बंडखोरी (Rebel) केल्यानंतर शिवसेनेतून (Shivsena) त्यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवण्यात आले. वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला म्हणून शिंदे गटातील आमदारांना हिणवण्यात आले. ही खिल्ली आमदारांच्या जिव्हारी लागली. आता या खिल्लीला कृतीतून उत्तर देण्याचे धोरण शिंदे सरकारने मनावर घेतले आहे. राज्यातील रिक्षावाला, वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला या समाजातील दुर्बल घटकांसाठी (Weaker sections of society) सरकार लवकरच कल्याणकारी योजना (welfare scheme) आणणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणतेही काम हलके, निम्न वा वाईट नसते असा संदेश सरकार देणार आहे. या समाज घटकांच्या विकासासाठी लवकरच शिंदे सरकार नवीन घोषणा करण्याच्या तयारीत आहे. माजी मंत्री व शिंदे गटाचे उदय सामंत (Uday Samant) यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत सूतोवाच केले. हा निर्णय झाला तर राज्यातील मोठ्या कष्टकरी वर्गाला त्यांच्या बाजूने खेचण्यात सरकार यशस्वी होईल हे वेगळे सांगणे न लागे.
शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतून त्यांच्यावर जहरी टिका करण्यात आली. एकनाथ शिंदेंना रिक्षावाला, तर त्यांच्या गटातील काही आमदारांना ते एकेकाळी वॉचमन, पानटपरीवाला,भाजीवाला असल्याचे हिणवण्यात आले. ही टीका राज्यात चर्चेचा विषय ठरली. शिंदे गटाने या टिकेवर तिखट प्रतिक्रिया दिली नाही. पण यामुळे कष्टकरी वर्ग दुखावला गेला. नेमकं हेच हेरून शिंदे गटाने आता या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी योजना आखण्याचे ठरवले असून येत्या काही दिवसात लवकरच सरकार याविषयीची घोषणा करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
राज्यात अंदाजे 8 लाख 32 हजार रिक्षा तर 90 हजार टॅक्सी परवानाधारक आहेत. हा कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी
योजना राबविण्याकरिता मंडळ स्थापन करण्याची मागणी सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन या वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.