5 वर्षात 4 ते 7 पट परतावा देतात, म्युचअल फंडच्या या योजना वाचल्यात का?

तुमच्या माहितीसाठी किमान १० स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी ५ वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात ४ ते ७ पटीने वाढ केली आहे. काय आहे या फंडांची खासियत?जाणून घ्या

5 वर्षात 4 ते 7 पट परतावा देतात, म्युचअल फंडच्या या योजना वाचल्यात का?
म्युच्युअल फंड
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 5:57 PM

वाढत्या महागाईमुळे तसेच वाढत्या गरजा लक्षात घेता आपण प्रत्येकजण कष्टाने कमावलेल्या पैश्यांचे योग्य नियोजन करत असतो. तर काहीजण पुढील भविष्यासाठी अनेक ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतात. सामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक म्युच्युअल फंड त्याच्या नवीन योजना काढत असतात. अश्यातच काही छोट्या म्युच्युअल फंड योजना आहेत ज्या अवघ्या 5 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 4ते 7 पटीने वाढतात. सर्व सामान्य गुंवणूकदारसाठी यापेक्षा चांगलं काय असू शकतं. तर तुम्हाला यात टॉप १० स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी ह्या योजना राबवल्या आहेत. या स्मॉल कॅप योजनांच्या परताव्याच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की त्यांचे फंड मॅनेजर गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यात खूप यशस्वी झाले आहेत. या 10 योजनांबद्दल आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत, पण त्याआधी स्मॉल कॅप फंडांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती घेऊया.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांची व्याख्या

सेबीच्या व्याख्येनुसार कोणत्याही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने आपल्या एकूण मालमत्तेच्या किमान ६५ % टक्के रक्कम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. या कंपन्या सामान्यत: बाजार भांडवलानुसार पहिल्या २५० कंपन्यांच्या बाहेर असतात आणि त्यांचे बाजारमूल्य १०० कोटी रुपयांपेक्षा कमी असते.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांचे फायदे

उच्च वाढीची क्षमता: स्मॉल कॅप कंपन्या त्यांच्या विकासाच्या दृष्टीने सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने त्यांना वेगाने वाढण्याची क्षमता मिळते.

जोखीम आणि अस्थिरता : या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक जोखमीचे असते कारण ते बाजाराच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असतात.

बुल आणि बिअर बाजारावर परिणाम : बुल मार्केटदरम्यान हे फंड मिड आणि लार्ज कॅप फंडांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात, तर बिअर मार्केटमध्ये त्यांची कामगिरी कमकुवत असू शकते.

5 वर्षात 4 ते 7 पट परतावा देणाऱ्या 10 योजना

फंडाचे नाव (डायरेक्ट प्लॅन) वार्षिक परतावा (CAGR) 5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य

Quant Small Cap Fund 47.82% 7,05,690 रुपये

Bank of India Small Cap Fund 39.62% 5,31,508 रुपये

Nippon India Small Cap Fund 37.03% 4,84,032 रुपये

Canara Robeco Small Cap Fund 36.07% 4,67,328 रुपये

Edelweiss Small Cap Fund 35.12% 4,51,079 रुपये

Tata Small Cap Fund 34.45% 4,40,012 रुपये

Invesco India Small Cap Fund 34.03% 4,33,272 रुपये

Kotak Small Cap Fund 32.67% 4,11,623 रुपये

HSBC Small Cap Fund 32.57% 4,09,811 रुपये

DSP Small Cap Fund 32.05% 4,02,096 रुपये

स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक कशासाठी?

स्मॉल कॅप फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात जे त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि त्यांच्या व्यवसायात पुढील काळात लक्षणीय वाढ आणि वैविध्य आणण्याची क्षमता आहे. छोट्या व्यावसायिक शेअर्सचेही काही वेळा अवमूल्यन केले जाते. या कंपन्या जसजशा विकसित होत जातात, तसतसे त्यांचे मूल्यांकन सुधारते. त्यामुळे त्यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळू शकतो. याशिवाय स्मॉल कॅप कंपन्या कधीकधी मोठ्या समूहांकडून अधिग्रहित केल्या जातात. तसे झाले तरी त्यांच्या शेअर्सच्या किमती वाढू शकतात.

गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा

स्मॉल कॅप फंडांमध्ये मिळणार उच्च परताव्याची तसेच उच्च जोखीम असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी आपली आर्थिक परिस्थितीनुसार जोखीम घेण्याची क्षमता समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा परफॉर्मन्स हिस्ट्री, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि पोर्टफोलिओ मॅनेजरच्या मागील रेकॉर्डची माहिती घेतली पाहिजे. याशिवाय स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा, कारण हे फंड दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात. त्यामुळे जे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेण्यास तयार आहेत आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करू इच्छितात ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप फंडांचा समावेश करण्याचा विचार करू शकतात. मात्र, पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप्सचा वाटा १०-१५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. तसेच स्मॉल कॅप फंडांच्या परताव्याची मागील आकडेवारी पाहताना हे लक्षात ठेवा की भविष्यात मागील कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची शाश्वती नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.