घरगुती कामगाराच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा
घरगुती कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. बजेटकडून मोलकरणींच्या काय आहेत अपेक्षा ते पाहा
निर्मला ताई नमस्ते, माझे नाव सीमा आहे ,मी लोकांच्या घरी काम करते.अडाणी हाय, म्हणून हे पत्र बी,ज्यांच्याकडे काम करते त्या दिदींकडून लिहून घेतलंय. त्यानाच माझे दुखणं सांगत असते.आमची दीदी शाळेत शिक्षक आहे. ती बातम्या वाचत आणि पाहत असते. त्यानीच मला सांगितलं की तुम्ही अख्खा देश चालवता, आणि सामान्य जनतेकडून सूचना मागितल्या ते. त्यामुळेच हे पत्र मोठया आशेनं पाठवून राहिले आहे. मॅडम, आमच्या मेहनतीचे खूप कमी पैसे मिळतात . आम्हाला तर आमचा पगार ठरवायचा देखील हक्क नाही. घर कामगारांसाठी कोणताच कायदा नाही…..
काय आहेत सीमाच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :