व्यापाऱ्यांच्या बजेटमधून काय आहेत अपेक्षा
जीएसटी, ई-वे बिलमुळे व्यापारी अडचणीत आलाय तसेच व्यवसाय वृद्धीसाठी लहान व्यापाऱ्यांसाठी सरकारची कोणतीच योजना नाही. व्यापाऱ्यांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा जाणून घ्या .
माझं नाव अश्विन आहे. नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत माझं दुकान आहे. मी गॅस शेगडीच्या व्यवसायात आहे, इतर राज्यांमध्येही माझा माल जातो. बजेटपूर्वी तुम्ही मोठ्या उद्योगपतींना भेटता. आम्ही लहान व्यापारी तुमच्यापर्यंत पोहचू देखील शकत नाहीत. त्यामुळेच हे पत्र लिहित आहे. अर्थमंत्रीजी, व्यवसायात सध्या थंड आहे. गॅस शेगडीच्या किंमती वाढत आहेत आणि महागाईमुळे शेगड्यांची मागणी देखील कमी होतेय मी गॅस शेगडी महाग केली नाही. स्टील आणि अॅल्युमिनियमच्या किंमती वाढल्यानं कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढलाय. वाहतुकीतही वाढ झाल्यानं गॅस शेगडी 15 ते 20 टक्के महाग झालीय. आता मध्यमवर्गीयांनी गॅस शेगडी खरेदी करणं बंद केलंय. मागणी कमी झाल्यानं उधारीसुद्धा वाढलीय.
पुढील पत्रात काय आहे ही जाणून घ्या :