Share Buyback : तर द्यावा लागतो का आयकर, बायबॅक ऑफरबाबत काय आहेत नियम
Share Buyback : गुंतवणूकदारांसाठी ही महत्वाची माहिती ठरु शकते. गेल्या आठवड्यापासून शेअर बायबॅकची चर्चा सुरु आहे. काही कंपन्या त्यासाठी तयारी करत आहे. तुम्ही पण बायबॅक ऑफरमध्ये शेअर विक्रीचा निर्णय घेतला असेल तर करासंबंधीचा हा नियम जरुर जाणून घ्या. याविषयी नियमात बदल झालेला आहे.
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही काही दिवसांपूर्वी बायबॅक ऑफरमध्ये शेअर्सची विक्री केली असेल तरी ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेक गुंतवणूकदार शेअर बायबॅकवरील (Share Buyback) कराविषयी संभ्रमात असतात. त्यांना कर कसा व कोणावर लागतो, हे लक्षात येत नाही. शेअर बायबॅकमध्ये ही अडचण त्यांना जाणवते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना त्याची नीट माहिती नसते. हा कर कंपनीला भरावा लागतो की आपल्याला, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम असतो. अनेक जण कंपनीने दिलेले बोनस शेअर बायबॅक ऑफरमध्ये विक्री करतात आणि मग कर भरावा (Income Tax) लागेल की काय याविषयी गुगलवर जाऊन सर्च करतात.
शेअर बायबॅकवर द्यावा लागेल कर?
तज्ज्ञांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये सवलत मिळत नाही. पूर्वी बायबॅक ऑफरमध्ये शेअर देणाऱ्यांना आयकर भरावा लागत होता. म्हणजे बायबॅक शेअरची विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना कर द्यावा लागत होता. तर लाभांशावर कंपनीला कर (Tax on Share Dividend) भरावा लागत होता. पण आता हा नियम बदलला आहे.
काय आहे नवीन नियम
नवीन नियमात आता बदल झाला आहे. तज्ज्ञांनी याविषयीची माहिती दिली आहे. तुम्हाला पण ही माहिती सहज मिळवता येईल. पूर्वी बायबॅक शेअरची विक्री करणाऱ्यांना आयकर भरावा लागत होता. तर कंपनी लाभांशावर कर भरत होती. या नियमात बदल झाला आहे. आता बायबॅकवर कंपनी कर जमा करते. तर लाभांशावर करदात्याला कर द्यावा लागतो.
कोणासाठी आहे हा नियम
शेअर बायबॅक आणि लाभांशावरील कराचा हा नियम केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच लागू आहे असे नाही तर सर्वच गुंतवणूकदारांना लागू आहे. मग आता याची माहिती आयटीआरमध्ये (ITR) कशी द्यावी असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी संबंधित अर्जात काही कॉलम असतो का? ही माहिती आयटीआरमध्ये कुठे नमूद करावी या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे.
ITR मध्ये कशी दाखवावी रक्कम
इनकम टॅक्स रिटर्नमध्ये कॅपिटल गेनचे एक पान असते. त्यावर बायबॅकचा पर्याय दिलेला असतो. यामध्ये बायबॅक अथवा डिव्हिडंडच्या रक्कमेची माहिती द्यावी लागते. बायबॅकच्या रक्कम यामध्ये नसली तरी व्यवहाराची माहिती गुंतवणूकदाराला आयटीआरमध्ये दाखवावी लागते.