Gold Price Update : महिला दिनी स्वस्तात खरेदी करा दागिने, भाव झाले इतके कमी

Gold Price Update : आज करा स्वस्तात सोने खरेदी करा. सणासुदीला सोन्या-चांदीच्या किंमती इतक्या झाल्या कमी. तुमच्या खिशावर नाही येणार ताण, स्वस्तात सोने खरेदीचा संधी आज आहे संधी..

Gold Price Update : महिला दिनी स्वस्तात खरेदी करा दागिने, भाव झाले इतके कमी
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 10:17 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून होळी, रंगोत्सवामुळे देशभर आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. तर आज महिला दिन साजरा होत आहे. हे दिवस अविस्मरणीय करण्यासाठी आज सोने खरेदीची संधी घेता येईल. आज स्वस्तात सोने (Gold Price) खरेदी करता येईल. होळी आणि रंगोत्सवामुळे देशातील सराफा पेढ्यात भाव अपडेट झालेले नाहीत. सोमवारी असलेल्या भावातच तुम्हाला सोने खरेदी करता येईल. भावात वाढ न झाल्याने तुमच्या खिशावर कसलाच ताण येणार नाही. गेल्या महिन्यात सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. विक्रमी भावापेक्षा शुद्ध सोने 2300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही (Silver Price) लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव घसरला. सध्या खरेदीदारांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे तर स्वस्त चांदीमुळे पण अनेकांची चांदी होत आहे.

सोमवारी सोने 14 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 56,089 रुपयांवर बंद झाले होते. तर त्याच्या मागील आठवड्यातील शुक्रवारी सोने 16 रुपये प्रति 10 ग्रॅमने महाग झाले होते. त्यावेळी भाव 56103 रुपये होता. सोमवारी सोने स्वस्त झाले होते. तर चांदीच्या किंमतीत तेजी आली होती. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या आठवड्यापासून फारसा बदलला नाही. 22 कॅरेटचा भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत वधारुन ती 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम बंद झाली होती. तर किलोमागे चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वधारली होती.

गेल्या पंधरवाड्यात 25 फेब्रुवारी रोजी शुद्ध सोन्याचा भाव 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 150 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 230 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात स्वस्ताई आली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपयांहून 51,650 रुपये झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपयांहून 56,350 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,350रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,650रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,350 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,680 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,380 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.