Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card After Death News : मृत्यूनंतर पॅनकार्डला कोण वाली? नातेवाईकांकडे की आयकर खात्याच्या हवाली? काय सांगतो नियम?

PANCARD after your Death : मृत्यूनंतर तुमच्या पॅनकार्डचं काय करण्यात येते. ते नातेवाईकांकडे जमा करण्यात येते की आयकर विभागाकडे जमा करण्यात येते ,चला तर माहिती घेऊयात

Pan Card After Death News :  मृत्यूनंतर पॅनकार्डला कोण वाली? नातेवाईकांकडे की आयकर खात्याच्या हवाली? काय सांगतो नियम?
मृत्यूनंतर पॅनकार्डला कोण वाली?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 5:09 PM

Pan Card Rules News : मृत्यू (Death) कोणाला चुकला भाऊ? पण संसारचक्र थांबते का तर नाही. ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतात. रहाटगाडा सुरुच राहतो. तर या रहाटगाड्यातील आणखी एक प्रश्न असा आहे की, आपल्या मृत्यूनंतर आपली प्रत्येक आर्थिक घडामोड टिपून ठेवणा-या या पॅनकार्डचं (Pan card) काय करायचं असतं? म्हणजे ते कुटुंबियांकडे, नातेवाईकांकडे (Relatives) द्यायचं की प्राप्तिकर, आयकर खात्याकडे (Income Tax Department) परत करायचं? तुमचं पॅनकार्ड हा महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. प्रत्येक कामासाठी पॅनकार्ड मागितले जाते. खासकरुन तुमच्या आर्थिक व्यवहारासाठी (Transaction) तर हा गेटपास असतो. बँकेत खाते उघडा, डीमॅट खाते उघडा, कर्ज काढा क्रेडिट कार्ड आणिक ब-याच कामात तुम्हाला पॅन कार्डचा पुरावा सादर करावा लागतोच. पण तुमच्यानंतर या पॅनकार्डचं करायचं का? हा प्रश्न समजून तर घ्यावा लागेल की नाही. याविषयी प्राप्तिकर खात्यानं काही नियम तर केलाच असेल? (What the rules say) मृत्यूनंतर तुमच्या पॅनकार्डचं काय करण्यात येते. ते नातेवाईकांकडे जमा करण्यात येते की आयकर विभागाकडे जमा करण्यात येते ,चला तर माहिती घेऊयात.

Pan Aadhar Link Last Date Over: आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही तुम्ही गमावून बसला आहात. तुमचा आळस तुम्हाला नडला म्हणावा अथवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, जे काही असेल त्याची किंमत तुम्हाला दुप्पटीने मोजावी लागणार आहे. 30 जून ही हे दोन ओळखपत्र जोडण्याची शेवटची तारीख होती. ही अंतिम मर्यादा उलटून गेल्याने तुम्हाला जोरदार झब्बू आता सहन करावा लागणार आहे. यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत.

नियम काय सांगतो?

  1. जर एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर त्याविषयीचा पॅनकार्डसंदर्भातील नियम निश्चित करण्यात आला आहे. अशावेळी ते पॅनकार्ड निष्क्रिय करणे अथवा प्राप्तिकर खात्याकडे परत करावे लागते.
  2. जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती, जिच्याकडे पॅनकार्ड आहे, तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे पॅनकार्ड परत करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खात्याकडे एक अर्ज करावा लागतो आणि त्यात पॅनकार्ड परत करण्याचे कारण स्पष्ट करावे लागते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. त्यानंतर मयत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्डची सत्यप्रत, क्रमांक यासोबत मृत्यू प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडून पॅनकार्ड परत करावे लागते.
  5. एक गोष्ट लक्षात ठेवा की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच पॅनकार्ड परत करण्याची घाई अजिबात करु नका. या व्यक्तिच्या पॅनकार्डचा वापर अनेक आर्थिक कामांसाठी करावा लागतो. अशावेळी संबंधित सर्व आर्थिक कामे पूर्ण झाल्याशिवाय पॅनकार्ड परत करु नका. त्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्या.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.