Gold Price Today: वाढीव व्याजदराने वाढवली सोन्याची चिंता, भाव घसरले; असा आहे आजचा सोन्याचा भाव

| Updated on: Jun 24, 2022 | 3:41 PM

स्पॉट गोल्डमध्ये 0.1 टक्क्यांची वाढ होत त्याचे दर 1,824.72 डॉलर प्रति औस वर पोहचले. हा दर गेल्या सत्रात आठवड्याच्या निच्चांकी पातळीवर म्हणजे 1,820.99 डॉलर इतका होता. अमेरिकेतील सोन्याचा वायदा बाजार 0.2 टक्क घसरून 1,825.90 डॉलरवर पोहचला.

Gold Price Today: वाढीव व्याजदराने वाढवली सोन्याची चिंता, भाव घसरले; असा आहे आजचा सोन्याचा भाव
सोन्याचे दर घसरले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Gold Silver Price in India: लागोपाठ दुस-या आठवड्यात सोन्याच्या किंमती (Gold Rate) घसरल्या आहेत. शुक्रवारी सोन्याच्या भाव घसरले. प्रमुख मध्यवर्ती बँकांनी (Central Bank) महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टच्या वायदा सोन्याच्या दरात (24 Carat Gold) मध्ये 0.12 टक्के प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवली. दरम्यान जुलै महिन्यातील वायदे बाजारात चांदीच्या किंमतीत 0.02 टक्के प्रति किलोग्रॅम वाढ झाली. या आठवड्यात सोन्याचे दर 0.9 टक्के पडले. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांची वाढ होत त्याचे दर 1,824.72 डॉलर प्रति औस वर पोहचले. हा दर गेल्या सत्रात आठवड्याच्या निच्चांकी पातळीवर म्हणजे 1,820.99 डॉलर इतका होता. अमेरिकेतील सोन्याचा वायदा बाजार 0.2 टक्क घसरून 1,825.90 डॉलरवर पोहचला. सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. तर दुसरीकडे शेअर बाजारातही चढ उतार सुरु आहे. गुंतवणुकदारांना (Investors) सोन्यात गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने त्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात दर वाढल्यास त्याचा फायदा गुंतवणुकदारांना होईल.

 

शुक्रवारच्या व्यापारी सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टच्या वायदा बाजाराचा भाव 61 रुपयांनी घसरले. सोन्याचा दर 50,533 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. तर जुले महिन्याच्या वायदे बाजारात चांदीची किंमत 10 रुपयांनी वाढली. चांदी 60,371 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढली. 24 जून 2022 रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम साठी 47,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 51,820 रुपये आहेत. कोलकत्ता शहरात 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम साठी 47,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 51,820 रुपये होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम साठी 47,450 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 51,760 रुपये होते. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम साठी 47,530 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 51,850 रुपये होते.

हे सुद्धा वाचा

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये गुरुवारी सोन्याचे दरात प्रति 10 ग्रॅम मागे 133 रुपयांची घसरण होते, ते 50,719 रुपयांवर पोहचले. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,852 रुपये इतके होते. चांदी गेल्या सत्रात 60,445 रुपये प्रति किलोचा भाव होता. त्यात घसरण होत, चांदी प्रति किलोला 59,781 रुपये प्रति किलो भावावर पोहचली.

स्वस्तात सोने खरेदी करण्याची शेवटी संधी

सॉवरेन गोल्ड बॉंड योजनेत गुंतवणुकीचा आजा शेवटचा दिवस आहे. इश्यु प्राईस 5,091 रुपये प्रति ग्रॅम आहे. ऑनलाईन पद्धतीने सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करणा-या ग्राहकांना 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी 8 वर्षांचा आहे. तर लॉक इन कालावधी हा 5 वर्षांचा आहे. जर तुम्ही 8 वर्षांचा कालावधी पूर्ण केला तर तुम्ही केलेली गुंतवणूक ही कर मुक्त असेल.