Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock : पेन्नी स्टॉक म्हणजे काय रे भाऊ? फसवणुकीपासून सावध कसा राहू

Penny Stock : कधी कधी शेअर बाजारात अल्पावधीतच अनेकांना लॉटरी लागते. पेन्नी स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. पण पेन्नी स्टॉक किती भरवशाचा असतो?

Penny Stock : पेन्नी स्टॉक म्हणजे काय रे भाऊ? फसवणुकीपासून सावध कसा राहू
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली : भारताच्या शेअर बाजाराची (Share Market) क्रेझ पुन्हा दिसून आली आहे. माघार घेतलेले गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळत आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजार जवळ केला आहे. पण गुंतवणूक करताना सावध राहिले नाही तर नवीन गुंतवणूकदारांची (Investors) फसगत होण्याची शक्यता आहे. कारण सध्या युट्युब, सोशल माध्यमांवर शेअर बाजार, गुंतवणुकीविषयी माहिती देणाऱ्या अनेक चॅनल्सचा सुळसुळाट आहे. त्यांचा सल्ला ऐकून तुम्ही पेन्नी स्टॉकमध्ये (Penny Stock) गुंतवणूक कराल, तर हे स्वस्तातील आमिष तुम्हाला महागात पडेल. त्यामुळे अभ्यासाशिवाय, स्टॉकची तांत्रिक माहिती असल्याशिवाय पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हे ‘आ बैल मुझे मार’ असे होईल.

झपाट्याने वाढला शेअर बाजार चांगले गुंतवणूकदार व्हायचे असेल तर तुम्ही संशोधन सुरु ठेवा. शेअर बाजाराची बाराखडी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जवळपास 9 वर्षांपूर्वी भारतीय शेअर बाजाराचा आकार आतापेक्षा तुलनेने जवळपास 3 पट कमी होता. BSE Sensex 31 मार्च 2014 रोजी 22,467.21 या उच्चांकावर बंद झाला होता. 6 जून रोजी बीएसई 62,602 अंकावर पोहचला आहे.

पेन्नी स्टॉकमध्ये खरंच फसवणूक ? जास्तीत जास्त नवीन गुंतवणूकदार पेन्नी स्टॉकला पसंती देतात. 5 अथवा 10 रुपयांचा शेअर त्यांना खूप आकर्षक वाटतो. हा शेअर एकतर स्वस्त असतो. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांची जमापुंजी याच शेअर्ससाठी खर्च करतात. पण जर वेळीच तुम्ही रिसर्च केला नाही. कंपनीला फटका बसला तर तुमच्या मेहनतीचा पैसा पाण्यात जाईल. या शेअर्समधून फायदा सोडा, नुकसानच नुकसान होईल. त्यामुळे पेन्नी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

या चूका टाळा

  1. 5 रुपयांचा शेअर 10 रुपयांचा होण्यासाठी कंपनीची दुप्पट प्रगती होणे आवश्यक आहे
  2. 500-1,000 रुपयांचा शेअर 750-1,500 रुपयांचा होण्यासाठी कंपनीला केवळ 50% ग्रोथ गरजेची असते
  3. अनेक पेन्नी स्टॉकचे फंडामेंटल मजबूत नसते
  4. काही कंपन्या वेळेनुसार, प्रगती साधतात. त्यांची ओळख निर्माण करतात
  5. पण अनेक कंपन्या बाजारातून भांडवल जमा करतात, पण नंतर त्यांची प्रगती होत नाही
  6. काहीतर लवकरच बाजारातून गाशा गुंडाळतात, त्याची माहिती गुंतवणूकदारांना पण नसते
  7. बाजारात गुंतवणूक करताना स्टॉप लॉस लावला नाही, टार्गेट निश्चित केले नाही तर तोटा होऊ शकतो
  8. पैसा बुडल्यावर गुंतवणूकदार बाजाराला जुगार म्हणतात, पण गुंतवणूक न करण्याचा निश्चय करतात

डोळे झाकून खरेदी नको शेअर बाजार हा मोठा समूद्र आहे. याठिकाणी मोठा मासा, लहान मासोळ्यांची शिकार करतो. शेअर बाजारात तुम्ही दिवसागणिक काही ना काही शिकता. नवनवीन अनुभव गाठिशी जोडता. चुका केल्या, पैसा गेला तर ती एकप्रकारची गुरु दक्षिणाच असते. या छोट्या छोट्या चुकांतून तुम्ही शिकला तर काही वर्षात तुम्ही भूलथापांना बळी पडत नाहीत.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.