चिल्ड्रन फंड म्हणजे कायरे भाऊ?, जाणून घ्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिल्ड्रन फंडाचा पर्याय निवडावा का?

बाजारात सध्या 11 कंपन्यांचे चिल्ड्रन्स फंड आहेत. यामध्ये केवळ एका फंडात लॉक इन कालावधी आहे. चिल्ड्रन्स फंडाच्या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात पैसे काढल्यास एक्झिट लोड द्यावा लागतो.

चिल्ड्रन फंड म्हणजे कायरे भाऊ?, जाणून घ्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिल्ड्रन फंडाचा पर्याय निवडावा का?
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 2:48 PM

राहुलची मुलगी रिया आता फक्त 4 वर्षांची आहे. परंतु त्याने आतापासूनच 14 वर्षानंतरच्या काळासाठी नियोजन सुरू केले आहे. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी (Education) तो दर महिन्याला बचत (savings) करत आहे. रियाच्या उच्च शिक्षणासाठी पैशाची कमतरता भासू नये यासाठी 12 ते 14 वर्षांत 50 लाख रुपयांचा फंड (fund) तयार करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.परंतु दर महिन्याला बँक खात्यात पैसे जमा करण्यात काही अर्थ नाही, कारण ते कधीही खर्च होऊ शकतात. फिक्स डिपॉझिट सुरक्षित आहे. पण त्याचवेळी त्याची नजर चिल्ड्रन प्लॅनवर पडली. चिल्ड्रन प्लॅनमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची हमी असते. चला तर जाणून घेऊयात राहुलने चिल्ड्रन फंडमध्ये गुंतवणूक करावी का ? मुलांच्या भविष्यासाठी चिल्ड्रन फंड योग्य आहे का याबाबत

राहुलसारख्या पालकांसाठी म्युच्युअल फंड चिल्ड्रन्स प्लॅन यांची सोय असते. यामध्येच आदित्य बिर्ला सन लाईफ भविष्य योजना, HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड , किंवा टाटा यंग सिटीजन्स या योजना समाविष्ट आहेत. हे फंड या कंपन्यांशी संबंधित असल्यानं ग्राहकांना आपल्या मुलांसाठी बचत करण्यासाठी अधिक आकर्षित करतात. हे फंड मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यात पैसे गुंतवण्याचे पर्याय देत असल्यानं या फंडांना सोल्यूशन ओरीएंटेड फंड असे देखील म्हणतात.

11 कंपन्यांचे चिल्ड्रन्स फंड

बाजारात सध्या 11 कंपन्यांचे चिल्ड्रन्स फंड आहेत. यामध्ये केवळ एका फंडात लॉक इन कालावधी आहे. चिल्ड्रन्स फंडाच्या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात पैसे काढल्यास एक्झिट लोड द्यावा लागतो. गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी राहावी यासाठी सुरुवातीच्या काही दिवसांत पैसे काढले तर त्यावर दंड लावण्यात येतो. ही दंडाची रक्कम गुंतवणुकीच्या 2 ते 3 टक्के इतकी असते. परंतु सध्या सर्वच चिल्ड्रन्स फंड 65 टक्के भाग किंवा त्याहून जास्त आणि काही 90 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये म्हणजेच शेअर बाजारात करतात.

हे सुद्धा वाचा

रिर्टन किती मिळतो?

DSP Flexicap ने गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण गुंतणुकीच्या 13.62 टक्के इतका परतावा दिला आहे.एलआयसी एमएफ चिल्ड्रन फंडने पाच वर्षात 8.38 टक्के इतका परतावा दिला आहे. तर टाटा यंग सिटीजन्सने गेल्या पाच वर्षांत 10.87 टक्के इतका परतावा दिला आहे. जर टाटा यंग सिटीजन्स फंडात 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर 2022 मध्ये ही रक्कम 16 हजार 761 रुपये झाली असती. तसेच 2017 पासून दर महिन्याला 1000 रुपयांची SIP केली असती तर एकूण 60 हजार रुपये मिळाले असते आणि परताव्यासोबत ही रक्कम 90 हजार 146 रुपये इतकी झाली असती.त्यामुळे परताव्याच्या बाबतीत चिल्ड्रन फंड आणि इक्विटी म्यूचुअल फंड जवळपास एकसारखेच आहेत.5 वर्षांचा इक्विटी फांडाचा परतावा 12 ते 14 टक्क्यांदरम्यान असतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

गुंतवणूकदार स्वतः शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतवणूक करत असल्यास मुलांसाठी साधारण इक्विटी फंडांची निवड करावी. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास चिल्ड्रन फंड तितके फायद्याचे नाहीत. या योजनांमध्ये एक्सपेंस रेशीओ आणि एक्झिट लोड अशा खर्चाचे गुणोत्तरही जास्त असतं. असे मनी मंत्राचे संस्थापक विरल भट्ट यांचं मत आहे.

चिल्ड्रन्स फंड हे नाव ऐकल्यानंतर गुंतवणूकदार भावनिक होतो. या फंडातून निश्चित परतावा मिळत नाही तसेच चिल्ड्रन फंड विशिष्ट ठिकाणी गुंतवणूकही करत नाहीत. इक्विटी किंवा फ्लेक्सी कॅप फंड ज्या ठिकाणी गुंतवणूक करतात त्याच ठिकाणी चिल्ड्रन फंड गुंतवणूक करतात. नावात बदल करून चिल्ड्रन फंडाद्वारे शेअर मार्केटद्वारे गुंतवणूक करण्याऐवजी थेट इक्विटी फंडाद्वारे गुंतवणूक करणं कधीही चांगलं असं तज्ज्ञांच मत आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.