Demat account : डीमॅट अकाऊंट म्हणजे काय? शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते? वाचा…

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंट असणे अनिवार्य असते. तुम्ही एखादा ब्रोकर अथवा वित्तीय संस्थेमार्फत डीमॅट अकाऊंट उघडू शकता. डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी प्रथम तुम्हाला डिपॉझिटरी सहभागी (डीपी) याची निवड करावी लागेल.

Demat account : डीमॅट अकाऊंट म्हणजे काय? शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:46 PM

तुम्हाला जर शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी 3 खात्यांची (Accounts) आवश्यकता असते. ही तीन अकाऊंट्स म्हणजे डीमॅट अकाऊंट, ट्रेडिंग अकाऊंट आणि बँक अकाऊंट. प्रत्येक अकाऊंटचे एक विशिष्ट काम असते, मात्र ट्रॅन्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीनही खाती एकमेकांवर अवलंबून असतात. शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे असेल तर ही तिनही खाती असणे आवश्यक असते. डीमॅट अकाऊंट हे बँक अकाऊंटप्रमाणेच असते. मेहनतीने कमावलेले पैसे कोणीही चोरू नयेत यासाठी आपण बचत खात्यात पैसे ठेवतो. तिथे ते डिजीटल करन्सीच्या रुपात असतात. त्याचप्रमाणे डीमॅट अकाऊंट गुंतवणूकदारांसाठी कार्यरत असते. शेअर्स आणि सिक्युरिटीज या डिजीटल स्वरूपात ठेवण्यासाठी डीमॅट किंवा डीमटेरियलाइज्ड अकाऊंट (Dematerialized account) वापरण्यात येते. या अकाऊंटमध्ये शेअर बाजारात खरेदी केलेले शेअर्स हे डिजीटल स्वरूपात ठेवण्यात येतात. खरेदी केलेले शेअर्स डिजीटल (Digital) स्वरूपात ठेवण्याच्या या प्रक्रियेला डीमटेरिअलायझेशन, असे म्हटले जाते. ट्रेडिंग झाल्यानंतर हे शेअर्स अकाऊंटमध्ये क्रेडिट अथवा डेबिट केले जातात.

डीमॅट अकाऊंटचे प्रकार :

गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रोफाईलनुसार, काळजीपूर्वकरित्या डीमॅट अकाऊंट उघडावे. भारतातील कोणीतीही व्यक्ती अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन डीमॅट अकाऊंट उघडू शकते. गुंतवणूकदार डिपॉझटरी सहभागी सह (Depository Participant- DP) डीमॅट अकाऊंट उघडू शकतात. 5Paisa https://bit.ly/3RreGqO येथे तुम्ही सहज, सोप्या पद्धतीने डीमॅट अकाऊंट उघडून ट्रेडिंग सुरू करू शकता. डीमॅट अकाऊंटचे चार प्रकार आहेत.

1) रेग्युलर डीमॅट अकाऊंट –

ज्या भारतीय गुंतवणूकदारांना केवळ शेअर्सची खरेदी-विक्री करायची आहे आणि सिक्युरिटीज डिपॉझिट करायच्या आहेत, त्यांच्यासाठी सामान्य डीमॅट अकाऊंट असते. जेव्हा तुम्ही शेअर्स विकाल, तेव्हा ते याच अकाऊंटमधून डेबिट ( वजा) होतील. आणि जर तुम्ही काही शेअर्स खरेदी केलेत, तर ते या अकाऊंटमध्येच क्रेडिट (जमा) होतील. मात्र तुम्ही इतर पर्यायांमध्ये ट्रेडिंग करत असाल तर डीमॅट अकाऊंट आवश्यक नाही. कारण अशा व्यवहारांमध्ये स्टोरेजची गरज लागत नाही.

हे सुद्धा वाचा

2) बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाऊंट –

मार्केट रेग्युलेटर ‘सेबी’ तर्फे (SEBI)हे एक नवे अकाऊंट सादर करण्यात आले आहे. छोट्या गुंतवणूकदारांना लक्षात ठेऊन या अकाऊंटची सुरुवात करण्यात आली आहे. या अकाऊंटमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र 50 हजार ते 2 लाख रुपयांचे पर्यंतचे स्टॉक्सस वा बॉण्ड्स ठेवल्यास 100 रुपये शुल्क भरावे लागते.

3) Repatriable डीमॅट अकाऊंट –

Repatriable डीमॅट अकाऊंट हे अनिवासी भारतीयांसाठी (NRI) असते. या अकाऊंटद्वारे ते भारतीय (शेअर) बाजारात गुंतवणूक करू शकतात. तसेच परदेशात पैसे हस्तांतरित करू शकतात. मात्र , या प्रकारचे डीमॅट अकाऊंट हे NRE (Non-Resident External) अकाऊंटशी जोडणे बंधनकारक आहे.

4) Non-repatriable डीमॅट अकाऊंट –

Non-repatriable डीमॅट अकाऊंट, हेही अनिवासी भारतीयांसाठीच (Non-resident Indians NRIs) आहे. पण या अकाऊंटच्या माध्यमातून परदेशात पैसे हस्तांतरित करता येत नाहीत.

डीमॅट अकाऊंटचे फायदे

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंट असणे अनिवार्य आहे. डीमॅट अकाऊंट उघडण्याचे अनेक फायदे आहेत. डीमॅट अकाऊंटमुळे शेअर्सचे हस्तांतरण जलदरित्या, कोणत्याही अडचणीशिवाय होते. डीमॅट अकाऊंटमध्ये ठेवलेले शेअर्स वा इतर सर्टिफिकेट्स हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. त्यामुळे शेअर्सची चोरी अथवा ते गहाळ होण्याची शक्यता शून्य असते. डीमॅट अकाऊंट ऑनलाइन असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे व आपण ते कधीही, कुठूनही चालवू शकतो. बोनस स्टॉक, स्प्लिट शेअर्स हे आपोआप खात्यात जमा होतात.

कसे उघडावे डीमॅट अकाऊंट?

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंट असणे अनिवार्य असते. तुम्ही एखादा ब्रोकर अथवा वित्तीय संस्थेमार्फत डीमॅट अकाऊंट उघडू शकता. डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी प्रथम तुम्हाला डिपॉझिटरी सहभागी (डीपी) याची निवड करावी लागेल. एखादी वित्तीय संस्था, अधिकृत बँक किंवा ब्रोकर यांची तुम्ही डीपी म्हणून निवड करून डीमॅट अकाऊंट उघडू शकता. डिपॉझिटरी सहभागीची (डीपी) निवड ही ब्रोकरेज ( शुल्क), वार्षिक शुल्क आणि लीव्हरेज , या आधारावर करण्यात यावी. डीपीची निवड झाल्यानंतर डीपीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन डीमॅट अकाऊंट उघडण्याचा फॉर्म भरा. त्यानंतर केवायसी (KYC) फॉर्मही भरा. त्यासह तुम्हाला काही कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यामध्ये पॅन कार्ड, निवासाचा पुरावा, ओळखपत्राचा पुरावा आणि पासपोर्ट साइज फोटोग्राफ द्यावे लागतील. व्हेरिफिकेशन (पडताळणी) प्रक्रियेवेळी सर्व ओरिजनल कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर बँक डिटेल्स देण्यासाठी तुम्हाला एक कॅन्सल्ड चेकही द्यावा लागेल.

सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच सही करा

पडताळणी प्रक्रियेनंतर तुम्हाला डिपॉझिटरी सहभागीसोबत करारावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात येईल. या करारामध्ये डिपॉझिटरी सहभागी आणि गुंतवणूकदार यांच्या सर्व जबाबदाऱ्यांची आणि हक्कांची माहिती दिलेली असते. ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच नंतर सह्या कराव्यात. आजकाल बरेच प्लॅटफॉर्म्स ऑनलाइन डीमॅट अकाऊंट उघडण्याची सुविधाही देतात. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे डीमॅट अकाऊंट उघडू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.