What is FPO : एफपीओ म्हणजे काय रे भाऊ? कंपन्यांना का आणतात बाजारात, गुंतवणूकदाराला फायदा काय

What is FPO : अदानी समूहाच्या एफपीओ रद्द करण्यामुळे अनेकांना हा काय प्रकार आहे, हे समजून घ्यायचे आहे.

What is FPO : एफपीओ म्हणजे काय रे भाऊ? कंपन्यांना का आणतात बाजारात, गुंतवणूकदाराला फायदा काय
काय होतो फायदा
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:44 PM

नवी दिल्ली : बाजारात काही दिवसांपासून अदानी एंटरप्राईजेसच्या (Adani Enterprises) एफपीओची चर्चा होती. हिंडनबर्ग अहवालानंतरही अदानी एंटरप्राईजसने एफपीओ (FPO) बाजारात उतरविला. 31 जानेवारी 2023 पर्यंत त्याची मुदत होती. याकाळात गुंतवणूकदारांनी त्याला प्रतिसाद ही दिला. कंपनीने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. या एफपीओचे सब्सक्रिप्शन झाल्यानंतरही कंपनीने तो रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गुंतवणूकदारांचे (Investors) आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. तर अनेकांना हा प्रश्न पडला आहे की एफपीओ आहे तरी काय? त्याचा फायदा कंपनीला काय होतो आणि गुंतवणूकदारांच्या पदरात काय पडते.

एफपीओ म्हणजे फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (Follow on Public Offer), शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीकडून एफपीओ सादर करण्यात येते. याअंतर्गत कंपनी बाजारातून मोठा निधी जमवितात. सध्याचे शेअर होल्डर आणि नवीन गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये गुंतवणूक करता येते.

आपण अनेकांनी आयपीओ हा शब्द ऐकला आहे. तर आयपीओ आणि एफपीओमध्ये (FPO vs IPO) नेमका काय फरक आहे. तर एफपीओ हा बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच जारी करु शकतात. तर आयपीओ बाजारात सूचीबद्ध नसलेल्या कंपनीला ही काढता येतो. आयपीओच्या माध्यमातून बाजारातून निधी जमा करता येतो.

हे सुद्धा वाचा

म्हणजे एखाद्या खासगी कंपनीला बाजारातून मोठा निधी जमा करायचा असेल तर ही कंपनी आयपीओ घेऊन येते. परंतु, बाजारात सूचीबद्ध असलेली कंपनी निधी जमा करत असेल तर त्याला एफपीओ असे म्हणतात. यातूनच कंपनीच्या भविष्यातील योजनांना पाठबळ मिळते.

एफपीओ हा दोन प्रकारचा असतो. मिश्रीत एफपीओ (Dilutive FPO) आणि मिश्रीत नसलेला एफपीओ (Non-Dilutive FPO) हे दोन प्रकार असतात. मिश्रीत एफपीओमध्ये कंपनी बाजारात अतिरिक्त शेअर घेऊन येते. त्याचा कंपनीच्या ईपीएसवर परिणाम होतो. तर दुसऱ्या प्रकारात खासगी कंपन्या गैर सूचीबद्ध शेअरची विक्री करतात. त्याचा ईपीएसवर परिणाम होत नाही.

शेअर बाजारात सूचीबद्ध कंपनी एफपीओ तेव्हाच घेऊन येते, जेव्हा कंपनीला भविष्यातील मोठ्या योजनांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. अनेकदा कंपन्यांना कर्ज कमी करण्यासाठी नवीन योजनांना अर्थबळ देण्यासाठी एफपीओ आणावा लागतो.

कोणताही गुंतवणूकदार ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरुन एफपीओमध्ये गुंतवणूक करु शकतो. अर्थात त्याने कंपनीला सध्या केलेली ही मदत असते. त्याचा त्याला तगडा मोबदला मिळतो. कंपनीला भविष्यात मोठा फायदा झाल्यास, गुंतवणूकदारांनाही त्याचा तगडा परतावा मिळतो.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.