सोनेश्वरचं उत्पन्न 5 लाख 50 हजार, मग टॅक्स किती?
Union Budget 2019 नवी दिल्ली: प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2019) सादर केला. या बजेटमधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. पूर्वी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंतच होती, ती दुपटीने वाढवून सरकारने नोकरदारांना दिलासा दिला. मात्र त्याचवेळी मोदी सरकारने नोकरदारांचा आनंद नियम आणि अटींमध्ये […]
Union Budget 2019 नवी दिल्ली: प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2019) सादर केला. या बजेटमधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. पूर्वी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंतच होती, ती दुपटीने वाढवून सरकारने नोकरदारांना दिलासा दिला. मात्र त्याचवेळी मोदी सरकारने नोकरदारांचा आनंद नियम आणि अटींमध्ये गुंडाळून टाकला. कारण 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं असलं तरी, त्यावर ज्यांचं उत्पन्न असेल, त्यांना जुन्या टॅक्स स्लॅबप्रमाणेच कर भरावा लागेल.
उदाहरणच द्यायचं झालं तर –
समजा, तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल, तर नव्या घोषणेप्रमाणे तुम्हाला शून्य टॅक्स अर्थात काहीही कर द्यावा लागणार नाही. मात्र तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचं अडीच लाखांपर्यंतचंच उत्पन्न करमुक्त असेल. त्यानंतर 5 टक्के कर भरावा लागेल. म्हणजेच, जुनी कररचनाच लागू होईल.
प्रश्न – सोनेश्वरचं उत्पन्न 7 लाख रुपये असेल तर त्याला किती इन्कम टॅक्स द्यावा लागेल?
उत्तर – सोनेश्वरचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असतं, तर त्याला पूर्ण टॅक्स सवलत मिळाली असती. मात्र त्याचं उत्पन्न 7 लाख असल्यामुळे त्याला 2018-19 चे टॅक्स स्लॅब लागू होतील. त्यानुसार त्याला पहिल्या अडीच लाखांवर काहीही टॅक्स लागणार नाही. त्यानंतर त्याचं टॅक्सेबल उत्पन्न (7 लाख वजा अडीच लाख) 4 लाख 50 हजार असेल. त्यावर जुन्या दराप्रमाणे 5 टक्के टॅक्स द्यावा लागेल.
टॅक्सबद्दल समज-गैरसमज
प्रश्न – सोनेश्वरचं उत्पन्न 5 लाख 50 हजार असेल तर त्याला केवळ 50 हजारांवर टॅक्स भरावा लागेल का?
उत्तर – नव्या नियमानुसार, 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री आहे, त्यामुळे केवळ वरील 50 हजार रुपयांच्या उत्पन्नाचा कर भरावा लागेल असा समज तुमचा असेल. पण तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला जुना टॅक्स स्लॅबच लागू होतो. म्हणजेच तुमच्या एकूण उत्पन्नापैकी (5.50 लाख) पहिल्या अडीच लाखावर कर सवलत मिळेल, त्यानंतर पुढच्या तीन लाख रुपयांवर 5 टक्के कर द्यावा लागेल.
संबंधित बातम्या
Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त