Share | भंगार शेअर, म्हणजे तरी काय? चार हात दूर का असतात गुंतवणूकदार

Share | जर गेल्यावर्षीच्या आकड्यांवर नजर टाकली तर काही पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे दिसेल. जवळपास 150 पेनी स्टॉकने 200% ते 2000% पर्यंत परतावा दिला आहे. अनेक लोकांना पेनी स्टॉक हा कमाईचा जॅकपॉट वाटतो. कमी पैशात मोठा परतावा मिळेल, असा त्यांचा समज असतो. पण प्रत्यक्षात काय होते, बाजारात काय करण्यात येते हे माहिती आहे का?

Share | भंगार शेअर, म्हणजे तरी काय? चार हात दूर का असतात गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारात जेव्हा पण रिटर्नची चर्चा होते. त्यावेळी वारंवार पेनी स्टॉकचे नाव निघतेच. गुंतवणूकदार नवीन असतो. त्यावेळी त्याला बाजाराची फारशी माहिती नसते. अशावेळी तो पहिल्यांदा पेनी स्टॉककडे वळतो. गुगल करताना स्वस्तातील शेअरकडे त्याचा सर्वाधिक ओढा असतो. पण बाजारातील अनेक तज्ज्ञ या पेनी स्टॉकलाच भंगार स्टॉक म्हणून ओळखतात. कारण त्यांच्या कथनी आणि करणीत तफावत दिसून येते. काही ब्रोकर्स, संस्था यामध्ये मोठी गुंतवणूक करतात. बाजारात हा पेनी शेअर तुफान कमाई करणार असल्याची आवई उठवतात आणि जादा दामाने तो विक्री करुन रफू चक्कर होतात. अशावेळी गुंतवणूकदारांनी सावध राहणे आवश्यक आहे. नाहीतर अनेकदा तो सावज होतो.

150 स्टॉकची कमाई

अत्यंत कमी किंमतीत मिळणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. 10-15 रुपयांपर्यंत हा स्टॉक सहज मिळतो. स्वस्ताई हेच या स्टॉकचे सर्वात खास वैशिष्ट्ये आहे. अशा कंपन्यांचे मूल्यांकन, बाजारातील भांडवल कमी असते. ज्या कंपन्यांचे फंडामेंटल चांगले असतात. अशा कंपन्या चांगला परतावा मिळून देतात. गेल्यावर्षी या पेनी स्टॉकने गुंतणूकदारांच्या झोळीत 200% ते 2000% पर्यंतचा परतावा टाकला. बाजारात असे जवळपास 150 पेनी स्टॉक आहेत.

हे सुद्धा वाचा

सहज होतो ऑपरेट हा पेनी स्टॉक

पेनी स्टॉकच्या कंपन्यांचे मूल्यांकन आणि बाजारातील भांडवल कमी असते. या कंपन्यांचे शेअर ऑपरेट करणे अत्यंत सोपे असते. हर्षद मेहताची सुरुवातच पेनी स्टॉक्स ऑपरेट करुन पैसा कमाविण्याने झाली होती. जर गुंतवणूकदारांनी कंपनीचे फंडामेंटल अथवा त्यांची ऑर्डर मिळण्याची क्षमता अधिक असेल. त्या कंपन्यांमधील गुंतवणूक भविष्यात चांगली ठरु शकते. आता सेबीने अनेक कडक नियम केले आहेत. अशा ऑपरेटर्सविरोधात ते कडक कारवाई करतात. पण छोट्या-मोठ्या शेअरमध्ये काही वृत्तानुसार बदल करता येतो आणि ऑपरेटर्स कमाई करतो.

इकडे द्या लक्ष

5 रुपयांचा शेअर 10 रुपयांचा होण्यासाठी कंपनीची जबरदस्त प्रगती होणे आवश्यक आहे. 500-1,000 रुपयांचा शेअर 750-1,500 रुपयांचा होण्यासाठी कंपनीला केवळ 50% ग्रोथ गरजेची असते. अनेक पेन्नी स्टॉकचे फंडामेंटल मजबूत नसते. काही कंपन्या वेळेनुसार, प्रगती साधतात. अनेक कंपन्या बाजारातून भांडवल जमा करतात, पण नंतर त्यांची प्रगती होत नाही. काहीतर लवकरच बाजारातून गाशा गुंडाळतात, त्याची माहिती गुंतवणूकदारांना पण नसते. बाजारात गुंतवणूक करताना स्टॉप लॉस लावला नाही, टार्गेट निश्चित केले नाही तर तोटा होऊ शकतो.

भूलथापांना बळी पडू नको

शेअर बाजार हा मोठा समूद्र आहे. याठिकाणी मोठा मासा, लहान मासोळ्यांची शिकार करतो. त्यामुळे पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. नाहीतर हा खेळ पंप अँड डंप असा होईल. युट्यूब, व्हॉट्सअप वा इतर एपवरील सल्ल्याचा सर्वांगाणे विचार करा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका. नाही तर मोठा फटका बसेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....