वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काय फरक? वॉरंटीच्या नावाखाली तुम्हाला कोणी फसवले का?

ज्या ग्राहकांना नंतर कळतात आणि त्यांना त्यांची वस्तू बदलणे किंवा दुरुस्त करणे खूप अवघड होते. अशा परिस्थितीत वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोघांमधील फरक जाणून घ्या आणि त्यांच्या अटींबद्दल माहिती मिळवा, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काय फरक? वॉरंटीच्या नावाखाली तुम्हाला कोणी फसवले का?
Free Warranty
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 8:02 AM

नवी दिल्लीः तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मशीनशी संबंधित वस्तू खरेदी करता, तेव्हा तुमचा पहिला प्रश्न असतो की उत्पादनाची वॉरंटी आणि गॅरंटी काय ? बरेच लोक वॉरंटी आणि गॅरंटीचा विचार समान गोष्ट म्हणून करतात, पण ते त्या दोन्ही गोष्टी एकमेकांपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत. तसेच त्यांच्या अनेक अटीसुद्धा आहेत, ज्या ग्राहकांना नंतर कळतात आणि त्यांना त्यांची वस्तू बदलणे किंवा दुरुस्त करणे खूप अवघड होते. अशा परिस्थितीत वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोघांमधील फरक जाणून घ्या आणि त्यांच्या अटींबद्दल माहिती मिळवा, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

वॉरंटीच्या अटी काय आहेत तेसुद्धा जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत. तसेच वॉरंटीच्या अटी काय आहेत तेसुद्धा जाणून घेणार आहोत. जर तुम्ही त्या अटींची पूर्तता केली नाही, तर तुमची नादुरुस्त वस्तू देखील दुरुस्त केली जात नाही. वॉरंटी आणि गॅरंटीशी संबंधित विशेष गोष्टी जाणून घ्या, ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत…

गॅरंटी काय आहे?

जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये दोष असेल आणि त्या वस्तूची गॅरंटी असल्यास दुकानदार किंवा कंपनीला ते उत्पादन बदलून द्यावे लागते. म्हणजेच तुम्ही नादुरुस्त वस्तू दुकानात घेऊन जाता आणि कंपनी त्याच्या जागी नवीन वस्तू देते. जुन्या सदोष वस्तूच्या बदल्यात नवीन वस्तू देण्याची गॅरंटी दिली जाते.

वॉरंटी म्हणजे काय?

ही गॅरंटीपेक्षा बरीच वेगळी आहे. गॅरंटीमध्ये ज्याप्रमाणे एखादी वस्तू सदोष असताना पूर्णपणे बदलली जाते, त्याचप्रमाणे ती वॉरंटी अंतर्गत बदलून मिळत नाही. यामध्ये खराब झालेली वस्तू बदलली जात नाही, उलट ती दुरुस्त केली जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही घरात मिक्सर आणले आणि ते वॉरंटी कालावधीतच खराब झाले, तर कंपनी ते दुरुस्त करते, यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही.

वॉरंटीच्या अटी काय आहेत?

वस्तू खरेदी करताना दुकानदार तुम्हाला वॉरंटीबद्दल सांगतो आणि तुम्ही वॉरंटीचा विचार करून वस्तू घरी घेऊन जाता. परंतु या वॉरंटीच्या मागे अशी एक अट आहे की, कंपनी आवश्यक असल्यास तुम्हाला सेवेचा लाभ देण्यास नकार देऊ शकते. म्हणूनच आपण वॉरंटीच्या अटींची देखील विशेष काळजी घ्यावी, कारण प्रत्येक वस्तूच्या आधारावर वेगवेगळ्या अटी आहेत. यामध्ये अनेक कंपन्या वॉरंटी अंतर्गत उत्पादनाची दुरुस्ती करताना सेवेसाठी शुल्क आकारत नाहीत, परंतु जर कोणताही भाग नवीन टाकल्यास त्याला पैसे द्यावे लागतील.

तेव्हा वॉरंटीचा लाभ मिळणार नाही?

वस्तूची वॉरंटी फक्त विशिष्ट कालावधीसाठी आहे. बहुतेक उत्पादनांच्या बाबतीत हा कालावधी 1 वर्ष आहे आणि त्यानंतर वस्तू खराब होण्यासाठी कंपनी जबाबदार नाही. तसेच जर वस्तू नुकसान, अपघात, गैरवापर, कीटकांचा हल्ला, अनधिकृत बदल, वीज, आग, निसर्ग समस्या इत्यादीमुळे खराब झाली असेल तर वॉरंटीचा लाभ उपलब्ध नाही. तसेच अनुक्रमांकाने छेडछाड केली असली तरी वॉरंटीचा लाभ उपलब्ध नाही. तसेच अशा अनेक वस्तू आहेत ज्यात वॉरंटी लिहिलेली आहे, परंतु त्यातील काही भागांची वॉरंटी आहे, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी 11 हजार कोटींच्या नव्या घोषणेच्या तयारीत, मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून ‘या’ सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.