Aadit Palicha : सोळावं वरीस धोक्याचं नव्हे, हटके करण्याचं! उभी केली 900 दशलक्ष डॉलरची कंपनी

Aadit Palicha : टॅलेंटला वयाचं बंधन कुठं असतं. ते चमकतंच. अगदी कमी वयात खटाटोप करणाऱ्या या तरुणाने आज 900 दशलक्ष डॉलरची कंपनी उभी केली.

Aadit Palicha : सोळावं वरीस धोक्याचं नव्हे, हटके करण्याचं! उभी केली 900 दशलक्ष डॉलरची कंपनी
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली : टॅलेंट वयाच्या बंधनात अडकत नाही. ते चमकतेच. त्याला वयाची मर्यादा नसते. टॅलेंट असेल तर कमी वयातही अनेक जण कमाल करतात. आपल्या आजुबाजूला अशी अनेक उदाहरणे आहेत. डोळसपणे पाहिल्यास त्यांनी वयाच्या मानाने मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे. जुगाड म्हणा अथवा स्टार्टअप (Start-Up) म्हणा या शब्दांचे गारुड सध्या तरुणाईवर आहे. त्यामाध्यमातून अनेकांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. व्यावसायिक भांडवल, अनुभव गाठीशी नसतानाही केवळ बुद्धीच्या जोरावर काहींनी इतिहास रचला आहे. अगदी कमी वयात या तरुणाने पण खटाटोप करुन आज 900 दशलक्ष डॉलरची कंपनी (Own Company) उभी केली आहे.

Zepto चा इतिहास Zepto या कंपनीची जाहिरात तुम्ही बघितली असेलच. ॲपच्या माध्यमातून ही कंपनी मोठी सुविधा देते. झेप्टो ॲपचे सह संस्थापक आदित पालिचा (Aadit Palicha) याने अवघ्या 16 व्या वर्षीच नाविन्याचा ध्यास घेतला. त्याने कमी वयात व्यवसायिक खटाटोप केला. त्याला त्यात सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला. परंतु काही दिवसांनी त्याने मेहनतीने यश खेचून आणले. झेप्टोच्या माध्यमातून त्याने यशाचे मॉडेल तरुणाईसमोर ठेवले.

कशी झाली सुरुवात वर्ष 2021 च्या एप्रिल महिन्यात Zepto ची सुरुवात झाली. ही कंपनी स्थापन झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच या कंपनीला, स्टार्टअपला 200 दशलक्ष डॉलरची मदत मिळाली. वर्ष 2022 मध्ये कंपनीचे बाजार मूल्य 900 दशलक्ष डॉलरवर पोहचले. आज Zepto ने त्यापुढे झेप घेतली आहे. या कंपनीची घौडदौड सुरु आहे. लवकरच या कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत समावेश होणार आहे. 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेल्या या कंपनीला युनिकॉर्न असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

शिक्षणची एबीसीडी मुंबईतील आदित पालिचाने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर पालिचा अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी पोहचला. पण स्वतःचा स्टार्ट अप असावा या जिद्दीने त्याला शिक्षण मध्येच सोडावे लागले. सुरुवातीला GoPool नावाने त्याने स्टार्टअप सुरु केला. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजेंस आधारीत प्रोजेक्ट प्रिवासी पण सुरु केला.

काय आहे Zepto दिल्ली-एनसीआर भागात Zeptoने अवघ्या 10 मिनिटात किराणा सामानाची डिलिव्हरी करण्याचा दावा केला आहे. अनेक कंपन्या झेप्टोच्या या संकल्पनेवर काम करत आहे. झेप्टो इतर उत्पादन सेवांवर पण लक्ष केंद्रीत करत आहे. झेप्टोने 2021 मध्ये 86 किराणा दुकानदारांसोबत करार केला. 10 लाख किराणा सामानाची कंपनीने डिलिव्हरी केली. कंपनी सध्या दिल्ली, चेन्नई, गुडगाव, बेंगळुरु आणि मुंबईत किराणा सामानाची घरपोच सेवा देत आहे. कैवल्य वोहरा आणि आदित्य पालिचा या दोघांनी मिळून Zepto ची सुरुवात केली आहे. दोघेही वर्गमित्र आहेत.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.