Gold Silver Price Today : सोने तोडणार सर्व रेकॉर्ड? आजचा भाव काय
Gold Silver Price Today : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्यावर पण दिसत आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळच्या सत्रात फ्लॅट होते. भाव जैसे थे होते. तर गुरुवारी राम नवमी असल्याने भावात अपडेट झाली नाही. आज सोने-चांदीचा भाव काय
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्यावर पण दिसत आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळच्या सत्रात फ्लॅट होते. भाव जैसे थे होते. शेअर बाजारापासून बँकिंग सेक्टरपर्यंत अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या सोन्याकडे वळले आहेत. गुंतवणुकीसाठी सोने (Investment in Gold) हे सर्वात सुरक्षित मानन्यात येते. त्यामुळे या पंधरवाड्यात सोन्याची मागणी गगनाला भिडली आहे. अनेक केंद्रीय बँकांनी पण सोन्यात गुंतवणूक वाढवल्याने सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी एकाएक उसळी घेतली आहे. तर चांदीही चमकली आहे. चांदीच्या किंमती यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी आगेकूच करत आहेत. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदी (Gold Silver Price Update) नवीन विक्रम करतील.
सोन्याची आगेकूच
गुरुवारी रामनवमी असल्याने सराफा बाजारातील भावात अपडेट झाली नाही. आयबीजीएने काल भाव जाहीर केले होते. त्यानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,106 रुपये तर संध्याकाळी ही किंमत 59,335 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,869 रुपये तर संध्याकाळी 59,097 रुपये होती. बुधवारी सोने 370 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढले. हा भाव 59335 रुपये प्रति तोळा होता. मंगळवारी सोने 58965 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते.
चांदी पण विक्रमाच्या दिशेने
चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. चांदीचा आलेख उंचावत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. एक किलो चांदी 73000 रुपयांच्या आता बाहेर खेळत आहे. चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचा कालचा भाव 73000 रुपये होता. आज हा भाव 73300 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती.
हॉलमार्क क्रमांक अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.
एका मिस्ड कॉलवर भाव
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.