Petrol Diesel Price : महागाईत मिळेल लवकरच दिलासा? आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलने महागाईत तेल ओतण्याचे काम केले आहे. डिझेलच्या किंमती वाढल्याने मालवाहतूक वाढली. पर्यायाने सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या. पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा वाढला. इंधनाचे दर कमी झाल्यास महागाई आटोक्यात आणण्यात मोठी मदत मिळू शकते.

Petrol Diesel Price : महागाईत मिळेल लवकरच दिलासा? आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलने महागाईत तेल ओतण्याचे काम केले आहे. डिझेलच्या किंमती वाढल्याने मालवाहतूक वाढली. पर्यायाने सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या. पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा वाढला. चार वर्षांपूर्वीचे पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) आणि आताच्या भावात मोठी तफावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आजही कच्चा तेलाचे, इंधनाचे दर गगनाला भिडलेले नाहीत. अजून ही दर 75 ते 87 डॉलर प्रति बॅरलच्या आतच खेळत आहे. मध्यंतरी काही दिवस या किंमतींनी शंभरी ओलांडली होती. पण त्यानंतर किंमती पुन्हा घसरल्या. भारतीय तेल विपणन कंपन्यांना (OMCs) नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारने भरमसाठ नुकसान भरपाई पण दिली आहे. आता गरज आहे ती गेल्यावर्षीपेक्षा जास्त कराची कपात करण्याची. कर कपात झाल्यास सर्वसामान्य जनतेला पेट्रोल 15 ते 20 रुपयांनी तर डिझेलही बरेच स्वस्त मिळेल. इंधनाचे दर कमी झाल्यास महागाई आटोक्यात आणण्यात मोठी मदत मिळू शकते.

कच्चे तेलाच्या किंमती (Crude Oil) गेल्या दोन महिन्यांपासून जास्त वाढलेल्या नाहीत. 11 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 76.68 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 82.64 डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झाला होता. त्यावेळी उत्पादन शुल्क कपात करण्यात आले होते. त्यानंतर मात्र मोठा बदल झालेला नाही.

करासंबंधी असा झाला बदल

हे सुद्धा वाचा
  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106. 45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108.07 पेट्रोल आणि डिझेल 96.02 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.43 आणि डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.35 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.92 तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.91 आणि डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.75 रुपये तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.