मुकेश-नीता यांच्या लाडक्या अनंत अंबानीचा पगार किती? मोठी बहीण ईशाला कमाईत देतो अशी टक्कर
Anant Ambani Salary : अनंत अंबानी याच्या लग्नाने अवघ्या जगाने लक्ष वेधले. हा सोहळा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता. प्री वेडिंग आणि मुख्य लग्नाच्या सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपवले. त्याची कमाई किती आहे, त्याला पगार किती, हे तुम्हाला माहिती आहे का?
Anant Ambani Networth : मुकेश अंबानी हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर आहे. मुकेश अंबानी यांची तीनही मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी हे कमाईत पण मागे नाहीत. मुकेश अंबानी यांनी कमी वयातच त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. त्यांचे व्यवसाय वाटून दिले आहेत. त्यामध्ये या तिघांनी प्रगती साधली आहे. अनंत अंबानीच्या लग्नाने जगाचे लक्ष वेधले. त्याचा पगार किती आहे, तुम्हाला माहिती आहे का?
अनंत अंबानी यांचे शिक्षण किती?
अनंत अंबानी, नीता आणि मुकेश अंबानी यांचा सर्वात धाकटा मुलगा आहे. अनंतचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. अनंतने धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतली ब्राऊन विद्यापीठातून पदवी मिळवली.
अनंत अंबानीकडे कोणती जबाबदारी
अनंत अंबानी अक्षय ऊर्जेवर काम करत आहे. ग्रीन आणि रिन्युएबल एनर्जीची जबाबदारी अनंत अंबानी याच्याकडे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील या क्षेत्रात अनंत अंबानी काम करत आहे. 2022 मध्ये अनंत अंबानी याची रिलायन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. याशिवाय जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची जबाबदारी पण त्याच्यावर आहे.
अनंत अंबानी याची नेटवर्थ
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंतची वार्षिक कमाई 4.2 कोटी रुपये आहे. तर अनंत अंबानीची वैयक्तिक कमाई 40 अब्ज डॉलर (जवळपास 3,32,482 कोटी रुपये) आहे. कमाईच्या बाबतीत अनंत हा मोठी बहीण ईशा अंबानी हिची बरोबरी करतो.
ईशा आणि आकाश अंबानीची कमाई
ईशा आणि आकाश अंबानी हे दोघे ही जुळे आहेत. ईशाचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला होता. तिच्याकडे रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ, रिलायन्स फाऊंडेशन आणि धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. तिची वार्षिक कमाई 4.2 कोटी रुपये आहे. रिलायन्स समूहातील शेअरच्या लाभांशातून होणारी कमाई वेगळी आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, ईशा अंबानी हिची एकूण संपत्ती 100 दशलक्ष डॉलर (831 कोटी रुपये) आहे. तर अनंत अंबानी हा रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा चेअरमन आहे. तो रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे संचालक आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास 5.4 कोटी रुपये आहे.