Tim Cook : काय आहे टीम कूक यांच्या यशाचं रहस्य, भल्यापहाटे उठल्याने असा मिळाला टर्निंग पॉईंट

Tim Cook : ॲपलचे सीईओ टीम कूक भल्यापहाटे 4 वाजता उठतात. हेच त्यांच्या यशाचं गमक असल्याचं बोलल जातंय, काय आहे हा सर्व मामला

Tim Cook : काय आहे टीम कूक यांच्या यशाचं रहस्य, भल्यापहाटे उठल्याने असा मिळाला टर्निंग पॉईंट
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:36 PM

नवी दिल्ली : जागतिक स्मार्टफोन बाजारात ॲपलने आपली मांड ठोकली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलने एंट्री केली आहे. ॲपलचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांनी मेहनतीने हे यश खेचून आणलं आहे. टीम कूक यांच्या लीडरशीपमध्ये ॲपलने (Apple) 235 कोटी रुपयांचे मार्केट कॅपचा टप्पा पार केला आहे. टीम कूक यांचे आयुष्य अत्यंत खडतर गेले. त्यांना अपार कष्ट उपसावे लागले. टीम यांचे वडील डोनाल्ड कूक शिपयार्डमध्ये तर आई गेराल्डिन या एका औषधाच्या दुकानात काम करत होत्या. त्यांनी कष्टातून ॲपलला जागतिक ओळख मिळवून दिले. ॲपलचे सीईओ टीम कूक भल्यापहाटे 4 वाजता उठतात. हेच त्यांच्या यशाचं गमक असल्याचं बोलल जातंय, काय आहे हा सर्व मामला..

मिळेल ते केले काम घर खर्च भागविण्यासाठी टीम कूक यांनी काही वर्ष औषधी दुकानात काम केले. त्यानंतर त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. अभ्यास केला. मेहनतीच्या जोरावर जगातील सर्वात दिग्गज कंपनीच्या सीईओच्या यादीत त्यांचं नावं आलं. ॲपलचे सीईओ टीम कूक आज जगातील चर्चित व्यक्तीपैकी एक आहे. कूक यांनी ओर्बन विद्यापीठातून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आणि ड्यूक विश्वविद्यालयातून एमबीए पूर्ण केले.

असा झाला प्रवेश ॲपलची प्रतिस्पर्धी कंपनी आयबीएममध्ये कूक यांनी 12 वर्षे काम केले. त्यानंतर कूक यांनी 1998 ॲपलमध्ये प्रवेश केला. ॲपलसाठी टीम कूक यांना भाग्यशाली मानण्यात येते. ते आल्यानंतर ॲपलने खऱ्या अर्थाने रॉकेट भरारी घेतल्याचं बोललं जातं. ज्यावेळी त्यांनी ॲपलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ही कंपनी जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. 2000 मध्ये कूक ॲपलच्या सेल्स ॲंड मॅनेजमेंट विभागाचे उपाध्यक्ष झाले. 2004 सालं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. ॲपल कंपनीच्या एका विभागाच्या सीईओपदी त्याचं वर्णी लागली. 2009 मध्ये स्टीव जॉब्स यांची तब्येत घसरल्यानंतर कूक यांना कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून संधी मिळाली.

हे सुद्धा वाचा

या बदलाने कंपनीचे नशीब पालटले बऱ्याचदा आपण कंपनी बदलली की नशीब पालटले असे म्हणतो. पण ॲपलचे नशीब टीम कूक यांच्या येण्याने पार पालटून गेले. 2011 मध्ये टीम कूक हे ॲपलचे सीईओ झाल्यानंतर या कंपनीचे नशीब बदलले. कंपनीचे मार्केट कॅप 235 लाख कोटींच्या पुढे गेले. टीम कूक यांना 2018 मध्ये 84 कोटी रुपयांचा बोनस मिळाला. 2022 साली कंपनीचे सीईओ म्हणून त्यांना वार्षिक 815 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. त्यानंतर यंदा त्यांनी स्वतःच पगारात कपात करत तो 402 कोटी रुपयांवर आणला.

भल्यापहाटे उठण्याचं गुपीत काय तर कंपनीच्या आणि टीम कूक यांच्या यशात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला तो टीम कूक यांचं भल्या पहाटे उठणं. कूक हे भल्यापहाटे 4 वाजतात उठतात. सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर लागलीच ग्राहकांचे फीडबॅक, त्यांच्या प्रतिक्रिया, ई-मेल वाचतात. ॲपल उत्पादनांबाबत ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. कुठे सुधारणा करणे गरजेचे आहे. ग्राहकांची कुठं नाराजी आहे, हे ते तपासतात. त्यावर उपाय शोधतात, त्यांच्या टीमला यावर काम करण्यास सांगतात. समस्या सोडविण्यावर त्यांचा जास्त भर असतो. ग्राहक हेच प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या यशात हा मोठा टर्निंग पाँईट असल्याचे त्यांनी सांगितलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.