Petrol Diesel Rate Today : एक लिटर इंधनासाठी आज तुमच्या खिशाला बसेल इतकी झळ, जाणून घ्या कोणत्या शहरात स्वस्त मिळत आहे पेट्रोल-डिझेल. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएवर...
Ad
कुठे स्वस्त, कुठे महाग
Follow us on
नवी दिल्ली : भारतीय तेल विपणन कंपन्या रशियाचे कच्चे तेल (Crude Oil) युरोपियन मार्केटमध्ये विक्री करत आहेत. त्यातून त्यांना फायदा झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कंपन्यांची तोटा झाल्याची ओरड नाही. कंपन्या दुहेरी नफा कमावत आहेत. पण त्याचा लाभ एक वर्षांपासून काही जनतेच्या पदरात पडला नाही. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फायदा झाला. पण सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून स्वस्तात इंधन मिळण्याचे केवळ आश्वासन मिळाले. आज एक लिटर इंधनासाठी तुमच्या खिशाला इतकी झळ बसणार आहे, जाणून घ्या कोणत्या शहरात स्वस्त मिळत आहे पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price).
अशी होते कमाई
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.
कच्चे तेल वधारले
आज 30 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 72.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 77.06 डॉलर प्रति बॅरल झाले.