Gold Price Hike : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड! 17 वर्षांपूर्वी एक तोळ्याची किंमत होती इतकी
Gold Price Hike : सोन्याच्य किंमतीत रेकॉर्ड ब्रेक तेजी दिसून आली आहे. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटात जगभरातील बाजारांना हादरा दिला आहे. यामुळे सोन्याच्या किंमती मजबूत होत आहे. त्यामुळेच सोन्याच्या किंमतीत रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटांमुळे (Banking Crisis) जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात (Sarafa Market) सोने 1400 रुपयांनी महागले. एक तोळ्यासाठी 60,000 रुपये मोजावे लागले. सोन्याने स्वतःचाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. आर्थिक संकट काळात भारतीय गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोने (Gold Price Record) हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गेल्या 17 वर्षांत सोन्याने गरुड भरारी घेतली आहे. 17 वर्षांपूर्वींचा भाव आणि आताच्या किंमतीत जमीन-आस्मानचा फरक पडला आहे.
का वाढताहेत किंमती
बाजारातील तज्ज्ञ, अनुज गुप्ता यांच्यानुसार, सोन्याच्या किंमतीत वाढीमागे अमेरिकेसह जगातील इतर देशातील बँकिंग सेक्टरमधील संकट हे आहे. अमेरिकेसह युरोपातील बँक धडाधड कोसळत आहेत. त्याचा फायदा सोन्यासह चांदीला होत आहे. डॉलर कमकुवत झाला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता आहे. शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे सोने वधारले आहे. यापूर्वीच्या आठवड्यात 55,000 रुपयांच्या जवळपास सोने व्यापार करत होते. आता एक तोळा सोने 60 हजार रुपयांना झाले आहे.
काय आहे संध्याकाळचा भाव
21 मार्च रोजी संध्याकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात बदल झाला. सोन्याच्या भावाने उसळी घेतली. 22 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली. एक तोळा सोन्यासाठी आता 55,150 रुपये भाव झाला. तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली. एक तोळा सोन्यासाठी 60,150 रुपयांचा भाव झाला.
आठवड्यात सोन्याची भरारी
सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात झपाझप वाढल्या. 13 मार्च रोजी सोमवारी सोने प्रति तोळा 56968 रुपये झाले. त्यानंतर गेल्या मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला. 15 मार्च रोजी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. गेल्या गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले. शनिवारी पुन्हा वाढ नोंदवली. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले. सोमवारी सोन्यात घसरण झाली. 21 मार्च रोजी सोन्यात 540 रुपयांची घसरण झाली.
तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमती सूसाट आहेत. सोन्याचा भाव पुढील महिन्यात 62000 रुपयांच्या घरात जाईल. एक तोळ्यासाठी आतापेक्षा ग्राहकांना दोन हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आणि इतर देशांच्या केंद्रीय बँकांच्या व्याजदरात मोठी वाढ झाल्याने बँकिंग क्षेत्रात संकट आले आहे. मंदीच्या आशंकेने सोन्याच्या किंमती चमकल्या आहेत. गेल्यावर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण आली होती. दिवाळीनंतर सोन्याचा दरफलक झपाट्याने आगेकूच करत आहे.
सुरक्षित गुंतवणूक
अमेरिकेतील बँकिग क्षेत्रात आलेल्या अभूतपूर्व संकटाचा परिणाम भारतात जाणवत आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याचा भाव 10 टक्क्यांपर्यंत वाढून 55,000 ते 60 हजारावर गेला आहे. सोन्याचा भाव वाढत असूनही गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत झालेली वाढ हेच दाखवून देते की बँकिग क्षेत्रातील संकट वाढत असताना आणि पसरत असताना लोक अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होईल या भीतीपोटी पाश्चात्त देशात मागणी वाढत आहे. मात्र भारतीय बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. कारण ग्राहक किंमती स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. ग्राहक या काळात ऑगमॉन्ट डिजिटल गोल्ड खरेदी करु शकतात व या प्राईज रॅलीचा लाभ घेऊ शकतात, असं ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलचे हेड रिसर्च डॉ. रेनिशा चैनानी यांनी सांगितलं.